पुणे

वीजवाहिन्या दुरुस्ती खर्च ठेकेदाराने देण्याचा आदेश

CD

पुणे, ता. १४ : सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइपलाइनच्या खोदकामात वारजे येथील महावितरणच्या उच्चदाब भूमिगत वीजवाहिन्या वारंवार तोडल्या जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवसांपासून या परिसरात खंडित वीजपुरवठ्याचा ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी महावितरणने महापालिकेला पत्र दिल्यानंतर पालिकेने संबंधित ठेकेदाराला वीजवाहिन्या दुरुस्तीचा खर्च महावितरणला देण्याचा आदेश दिले आहेत.
महावितरणने यासंदर्भात पुणे महापालिकेच्या मलनि:सारण देखभाल व दुरुस्ती विभागाला लेखी पत्र दिल्यानंतर वारजे येथील खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणाची संयुक्त पाहणी केली. सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन टाकण्यासाठी पुणे महापालिकेच्या ठेकेदाराकडून जेसीबीद्वारे वारजे परिसरात खोदकाम सुरू आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने याबाबत महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना पूर्वकल्पना दिली नाही. यामध्ये १ ते ८ मार्च दरम्यान वारजे ब्रीज, खानवस्ती, वारजे वाहतूक पोलिस चौकी, रामनगर तसेच वारजे पाणीपुरवठा याठिकाणी २२ केव्हीच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडल्या होत्या. परिणामी पुणे मेट्रो, डहाणूकर कॉलनी, प्रथमेश सोसायटी, भुजबळ टाऊनशिप, डुक्करखिंड परिसर, खानवस्ती, हिंदुस्थान बेकरी, रामनगर आदी परिसरात सुमारे चार हजार वीजग्राहकांना दोन तासांपर्यंत खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला तर उर्वरित ठिकाणी महावितरणने पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत ठेवला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: रचिन रविंद्रचे शानदार अर्धशतक! चेन्नईच्या आशाही फुलवल्या

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT