पुणे

उपनगरांत कोयता गँगने पुन्हा डोके काढले वर

CD

पुणे, ता. २२ : पोलिसांनी कोयता गॅंगमधील गुन्हेगारांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा धडाका लावला आहे. परंतु गेल्या चार-पाच दिवसांत उपनगर परिसरात कोयता गँगने पुन्हा डोके वर काढले आहे. गुन्हेगारी टोळकी कोयत्याचा वापर करून नागरिकांमध्ये दहशत पसरवत आहेत. अशा सराईत गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सिंहगड परिसरात डोक्यात वार
सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याची घटना तुकाईनगर वडगाव परिसरात घडली. टोळक्याने कोयते हवेत फिरवत दहशत माजवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत फिर्यादी राहुल रामचंद्र भंडारी (वय ३९, रा. नऱ्हे) हे जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दाद्या मोरे (वय २१, रा. वडगाव बुद्रुक) आणि एका अल्पवयीन मुलाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

पर्वती गावात रस्त्यात अडवून हल्ला
तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना दुपारी पर्वती गावात घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी नवनाथ वाडकर आणि शेखर वाघमारे (दोघे रा. जनता वसाहत, पर्वती पायथा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयुष विठ्ठल चव्हाण (वय २१, रा. वाघोली) असे जखमीचे नाव आहे. आरोपी नवनाथची आश्विन रेणुसे याच्याशी भांडणे झाली होती. आयुष हा त्याचे मित्र आश्विन आणि मुसा पटेल यांच्यासमवेत दुचाकीवरून जात होता. पर्वती पायथा परिसरात आल्यानंतर आरोपींनी आयुष आणि त्याच्या मित्रांना अडवले. वाडकर याने आयुष याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

येरवड्यातील मॉलमध्ये कोयत्याची दहशत
पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा मागे न घेतल्याच्या कारणावरून सराईत गुन्हेगारांनी तरुणाला कोयत्याने धमकावले. तसेच कॉफी शॉपच्या काउंटरवर कोयत्याने वार करून महिलेसह दोघांना दमदाटी केली. ही घटना येरवडा येथील ईशान्य मॉलमधील कॉफी शॉपमध्ये शनिवारी (ता. १८) सायंकाळी घडली. याबाबत रोहित राजेंद्र वाघमारे (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याने फिर्याद दिली. त्यावरून येरवडा पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. निखिल कांबळे, हुसेन शेख, हर्ष जाधव, सिद्धार्थ भोला, साहिल कांबळे, सुदेश गायकवाड आणि तुषार चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत.

कबुतरे चोरल्याच्या वादातून वार
कबुतरे चोरल्याच्या वादातून तिघांनी एका तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले. या हल्ल्यात साहिल सतीश गायकवाड (वय २२, रा. ओहाळ वस्ती, लोहगाव) हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना लोहगाव स्मशानभूमीजवळ घडली. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी अक्षय सगळगिरे, अभी धिवार आणि अन्य एका तरुणाविरुद्ध (तिघे रा. लोहगाव) गुन्हा दाखल केला आहे.

नांदेड फाट्याजवळ गॅंग पुन्हा सक्रिय
किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ गोसावी वस्ती येथे कोयता गॅंग पुन्हा सक्रिय झाली आहे. एका टोळीने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात विजय विठ्ठल मरगळे (वय ३१, रा. नांदेड, ता. हवेली) हा तरुण जखमी झाला. मरगळे हा गोसावी वस्ती येथील त्याच्या मित्राच्या घरी गेला होता. मित्र आणि तो खाली इमारतीच्या पार्किंगला थांबलेले असताना अचानक हातात कोयते, लोखंडी रॉड घेऊन आलेल्या पाच-सहा जणांनी विजयवर हल्ला केला. पोलिसांनी सूरज ऊर्फ सागर संतोष सहा (वय २१), मुकुंद ऊर्फ मुक्या चंद्रकांत चव्हाण (वय २३), शुभम ऊर्फ झेंड्या दिलीप पवार (वय २२) व अजय विजय आठवले (वय १९, सर्व रा. गोसावी वस्ती) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT