पुणे, ता. २१ ः ‘गली में आज चांद निकला’... ‘कही दूर जब दिन’... ‘सारा प्यार तुम्हारा’... या हिंदी चित्रपटातील अजरामर गीतांची मोहिनी पुन्हा एकदा रसिकांनी अनुभवली. गायिका प्रज्ञा गौरकर, देवेंद्र पराते, कैलास देसले आणि प्रा. रवींद्र शाळू या कलाकारांनी सादर केलेल्या सदाबहार गीतांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
निमित्त होते, ‘स्वच्छंद, पुणे’ प्रस्तुत आणि ‘प्रतिसाद’ प्रकाशित ‘ऐसा समा ना होता’ या नव्या-जुन्या हिंदी गीतांच्या स्वरमैफलीचे. याप्रसंगी शिवप्रसाद गौरकर, अॅड. नरेंद्र निखारे, बी. आर. शिंपले, प्रिया लांजेकर, नागेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गीतांसह दृकश्राव्याच्या माध्यमातून सिनेकलाकारांची छायाचित्रे आणि चित्रफिती दाखविण्यात आल्या. काही कृष्णधवल आणि काही रंगीत चित्रपटातील गीते ऐकताना रसिकांनी त्या काळातील चित्रपट सृष्टीची सफर केली. चित्रपट, गीत, गीतकार, संगीतकार, गायक यांविषयी कार्यक्रमात विविध प्रश्न देखील रसिकांना विचारण्यात आले. सिद्धार्थ यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन पुष्कर देसले व राहुल गौरकर यांनी केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.