पुणे

‘द ब्रिंजल कट आऊट’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड

CD

पुणे, ता. २१ ः नाटक करण्याच्या उद्देशाने एकत्र आलेली हौशी मंडळी एक संस्था स्थापन करतात. काही नाटकांचे प्रयोग झाल्यानंतर ते लघुपटाची निर्मिती करायचे ठरवतात. एक लघुपट तयार होतो, सहज म्हणून स्पर्धेला पाठवला जातो आणि चक्क आंतरराष्ट्रीय महोत्सवात त्याची निवडही होते. ही कथा आहे, ‘अविरत’ संस्थेची आणि त्यांच्या ‘द ब्रिंजल कट आऊट’ या लघुपटाची.
या लघुपटाची लंडनच्या ‘लिफ्ट ऑफ फिल्म मेकर’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली. सोमवारी (ता.२७) लंडनच्या पिनवूड स्टुडिओ येथे हा लघुपट दाखवला जाणार आहे. उर्दू लेखक किशन चंद्र यांच्या ‘बैंगन’ या कथेवर आधारित हा लघुपट आहे. ‘‘एक नोकरी गमावलेला मुलगा पुन्हा नोकरीच्या शोधात असतो. त्यावेळी गुंतवणुकीशिवाय व्यवसाय करण्याची कल्पना त्याला सुचते. देवाच्या नावाखाली लोकांना फसवून पैसे कमवायला तो सुरूवात करतो. पुढे काय होते, ही कल्पना किती काळ यशस्वी होते,’’ यावर हा लघुपट बेतलेला आहे.
या लघुपटाला चाळीस मिनिटांचा कालावधी आहे. त्याचे दिग्दर्शन, पटकथा आणि संगीत नीलेश गुप्ता यांचे असून चित्रीकरण अश्विन पांडे यांनी केले. प्रसिद्धी आणि कला दिग्दर्शनाची जबाबदारी विनोद मिठारी यांनी सांभाळली. प्रसन्न जोशी, रश्मी लोहिया, राजस कोठावळे, श्याम देगलूरकर, पराग डांगे आदी कलाकारांनी या लघुपटात विविध भूमिका साकारल्या आहेत. -

‘अविरत’ म्हणजे सतत. त्यामुळे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही सतत काहीतरी चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. नाटक असो किंवा लघुपट, आम्ही आमच्या कलाकृतीतून सामाजिक विषय हाताळण्याचा प्रयत्न करतो. लंडनच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात आमच्या या प्रयत्नांची दखल घेतल्याचा आनंद आहे.
-नीलेश गुप्ता, लघुपटाचे दिग्दर्शक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT