पुणे

सजग सहचारिणी

CD

आनंदीबाई उर्फ बाया कर्वे यांची आज (सोमवार, ता. ५) १६१ वी जयंती आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याचा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेश त्रिभुवन यांनी घेतलेला आढावा.

आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या द्वितीय पत्नी. त्यांचा जन्म ५ जून १८६३ मध्ये कोकणातल्या देवरुख या गावी झाला. बाळकृष्ण केशव जोशी हे त्यांचे वडील. त्यावेळी पावसकर जोशी यांचे घराणे देवरुख गावी (जि. रत्नागिरी) सुस्थितीतले म्हणून समजले जात असे. त्यांच्या घराण्याकडे उपाध्येपण होते. त्यांना एकूण ११ अपत्ये झाली. त्यात गोदा आणि कृष्णा या दोन मुली होत्या. गोदाचे लग्न वयाच्या आठव्या वर्षीच झाले. त्यानंतर तीन वर्षांनी त्यांना वैधव्याला सामोरे जावे लागले. त्या काळातील वैधव्याच्या अनेक सनातन प्रवृत्तींना त्यांना सामोरे जावे लागले.

त्या आपल्या भावाकडे मुंबईला गेल्या तेव्हा त्यांच्या भावाच्या शेजारी धोंडो केशव कर्वे आपल्या पत्नीसह राहत होते. तिथे आनंदीबाईंचा त्यांच्याशी चांगला परिचय झाला. त्यावेळी गोदाकडून कर्वे यांच्या पत्नीला स्वयंपाकातही मदत होत असे. दरम्यानच्या काळात धोंडो केशव कर्वे यांना पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापकपदाची नोकरी मिळाली. काही काळानंतर त्यांच्या पत्नीचे निधन झाले. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा व २१ वय असलेल्या गोदाबरोबर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर व पंडिता रमाबाई रानडे यांच्या उपस्थितीत विधवा-विधुर पुनर्विवाह केला. या पुनर्विवाहामुळे समाजात खळबळ माजली. या दांपत्याला आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या गावातून बहिष्कृत करण्यात आले. या प्रसंगी गोदाचे नाव आनंदीबाई ठेवण्यात आले. त्यांची पूर्वी बाया या नावानेदेखील ओळख होती.

धोंडो केशव कर्वे यांनी आपले सर्व जीवनच समाजकार्याला वाहून घेतले होते. पुढे त्यांना तीन अपत्ये झाली. आनंदीबाई यांनी मिडवाइफरीत डिप्लोमा केला. त्यानंतर आपल्या पतीचे आत्मचरित्र असलेले ‘आत्मवृत्त’ (१९१५) हे पुस्तक विकण्यासाठी संपूर्ण देशभर प्रवास केला. या पुस्तकाचे लुकिंग बॅक (१९३६) या नावाने इंग्रजीत भाषांतर केले गेले आहे. आफ्रिकेत वैद्यकीय शिक्षण घेत असलेले त्यांचे थोरले चिरंजीव डॉ. शंकर कर्वे यांच्याकडे काही काळ गेल्यानंतर तिथेही त्यांनी विधवांच्या घरांसाठी निधी गोळा केला. विधवा-विधुर पुनर्विवाहाच्या वेळी धोंडो केशव कर्वे यांची तब्येत अतिशय नाजूक होती. अशास्थितीत रमाबाईंनी त्यांना स्वतःचा विमा उतरवायला सांगितले होते. कारण भविष्यात काही अघटित घडले तर आनंदीबाई यांना चरितार्थासाठी काही रक्कम हाताशी येईल, असे त्यांना वाटले होते. परंतु कर्वे यांना दीर्घायुष्य लाभले आणि ती विम्याची रक्कमदेखील कर्वे यांनी आपल्या संस्था कार्यासाठीच वापरली.

आनंदीबाईंनी आपल्या ८७ वर्षांच्या आयुष्यात ६६ वर्षे धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री शिक्षण कार्यासाठीच दिली, असे म्हटले तर ती गौरवाचीच बाब होईल, असे मला वाटते. त्यांच्या ‘माझे पुराण’ (१९४४) या आत्मकथनातूनही आपल्याला त्यांच्या आयुष्याविषयी माहिती मिळते. हे पुस्तक म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या सजग सहजीवनाचा वस्तुपाठ आहे. तसेच तो शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीच्या चालीरितींवर प्रकाश टाकणारा सामाजिक दस्तऐवज आणि स्त्रीच्या सुखदुःखाचा आरसा आहे. त्यातील पानापानांतून याची प्रचिती येते. आनंदीबाई ऊर्फ बाया यांचा प्रांजळपणा, परखडपणाही प्रतित होतो. तसेच मनावर कोरली जाते ती आत्मनिर्भर स्त्रीची प्रतिमा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT