पुणे

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

CD

पुणे, ता. ४ : लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने एका तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवत तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. परंतु तिच्याशी लग्न न करता तरुणाने दुसऱ्याच तरुणीसोबत साखरपुडा करून धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत वडगाव शेरी येथील एका २३ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यावरून शुभम पायगुडे (रा. आगळंबे, ता. हवेली) यांच्यासह पाचजणांविरुध्द भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायगुडे याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. कात्रज येथील एका हॉटेलमध्ये तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याकडून एक लाख रुपये घेतले. शुभमच्या भावाने त्या दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत घरी सांगितले. तेव्हा शुभमच्या कुटुंबीयांनी फिर्यादी तरुणीला शिवीगाळ केली. तसेच, त्याचा दुसऱ्या तरुणीसोबत साखरपुडा केला. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी तरुणी गेल्यानंतर तिला धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

टेम्पोचालकावर कोयत्याने वार करून लुबाडले
पुणे : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी टेम्पोचालकावर कोयत्याने वार करून त्यांच्याकडील साडेपाच लाख रुपये लुटले. ही घटना तुळापूर येथील इंद्रायणी नदीवरील पुलाजवळ शनिवारी घडली.
या प्रकरणी रियाज चाँदभाई मुलाणी (वय ४१, रा. वाडेबोल्हाई, वाडेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यावरून तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे शनिवारी आठवडे बाजारासाठी फिर्यादी आणि त्यांचा साथीदार राजेंद्र जाधव हे टेम्पोतून जात होते. इंद्रायणी पुलाजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी टेम्पोला दुचाकी आडवी लावून थांबवले. चोरट्यांनी फिर्यादीला मारहाण करून दंडावर कोयत्याने वार करून जखमी केले. तसेच, त्यांच्या खिशातील साडेपाच लाख रुपये आणि मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरटे पसार झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT