पुणे

पुण्यात घडणार त्रिवेणी संगम

CD

पुणे, ता. ६ ः पुणेकरांसाठी जून महिना विशेष ठरणार आहे. संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनामुळे शहरातील वातावरण भक्तिमय होणार आहेच. त्याचबरोबर ‘जी-२०’ परिषदेतील आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि शिक्षण क्षेत्राचे धोरण तयार करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञ मंडळी पुण्यात मंथन करणार आहेत. यानिमित्ताने अध्यात्म, उद्योग अन् शिक्षण असा आगळा वेगळा त्रिवेणी संगम पुणेकारांना अनुभवण्यास मिळणार असून, त्याच्या तयारीसाठी पुणे महापालिकेची लगबग सुरू आहे.
जी २० परिषदेच्या आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स या अभ्यासगटाची बैठक १२ ते १४ जून या कालावधीत होणार आहे. १९ ते २२ जून या चार दिवसांत विद्येचे माहेरघर आलेल्या पुण्यात शिक्षण या अभ्यासगटाची बैठक होणार आहे. दोन्ही बैठकांसाठी सुमारे ३७ देशांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिक्षण गटाच्या बैठकीत दोन दिवस जी-२० सदस्य देशाचे मंत्रीदेखील उपस्थित राहतील. त्यासाठी महापालिकेने विदेशी पाहुण्यांचे स्वागत, खानपान, सांस्कृतिक कार्यक्रम यांची जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यांना पुण्यातील पर्यटनस्थळांसह सिंहगड किल्ल्यावर घेऊन जाण्याचे नियोजनही सुरू आहे.
एकीकडे ही तयारी सुरू असताना दुसरीकडे १२ ते १४ जून या कालावधी पुण्यात आषाढी वारीनिमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मुक्कामी येणार आहे. वारकरी आणि तज्ज्ञ परदेशी पाहुण्यांचे एकत्रित स्वागत करण्यासाठी महापालिकेची तयारी सुरू आहे. स्वच्छतेसह सुशोभिकरण, आकर्षक विद्युत रोषणाई, वारकऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

वारकऱ्यांचे स्वागत अतिशय चांगल्या पद्धतीने केले जाईल, तसेच वारकरी मुक्कामी असताना त्यांच्यासाठी सर्व सुविधा पुरविल्या जातील. जी-२० साठी परदेशी पाहुण्यांचे स्वागत भव्य पद्धतीने केले जाईल. त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे, ही आगळी वेगळी संधी आहे.
- विक्रम कुमार, आयुक्त महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं?

SCROLL FOR NEXT