पुणे

‘डॉ. जयकर कौशल्य कार्यक्रमा’त सहभागासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत

CD

पुणे, ता. १९ : ग्रामीण भागातील तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन राबविण्यात येणाऱ्या डॉ. एम. आर. जयकर रोजगारक्षम कौशल्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविले आहेत. हे प्रस्ताव सादर करण्यासाठी महाविद्यालयांना १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे.

विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विशेषत: ग्रामीण भागातील तसेच आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन डॉ. एम. आर. जयकर रोजगारक्षम कौशल्य कार्यक्रम २०१८-१९ पासून सुरू केला आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी या योजनेअंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांनुसार ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव फक्त ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या रोजगार व उद्योगक्षमता अभ्यासक्रमावर आधारित आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या फक्त तृतीय वर्षाच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम असेल. यात तज्ज्ञांद्वारे २० तास वैयक्तिक प्रशिक्षण आणि ४० तास ई-लर्निंग असा एकूण ६० तासांचा समावेश आहे. विद्यापीठामार्फत महाविद्यालयाच्या बीओडी लॉगिनमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळातर्फे मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या ई-बुकची सुविधा सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी महाविद्यालयांनी विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. रवी अहुजा यांची संपर्क साधावा, अशी सूचना विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT