पुणे

चुकवू नये असे काही

CD

१) ‘रंग तरंग’
धनश्री केळकर यांच्या ‘रंगोदय आर्ट्स’ या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या चित्राचे ‘रंग तरंग’ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पाच वर्षीय मुलगा ते ४५ वर्षांच्या व्यक्तीने काढलेली सुमारे १०० चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे. एकूण १८ विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
कधी ः शुक्रवार (ता. २१) ते सोमवार (ता. २४)
केव्हा ः सकाळी १० ते रात्री ८
कुठे ः दर्पण आर्ट गॅलरी, सेनापती बापट रस्ता

२) ‘क्षण’ छायाचित्र प्रदर्शन
स्टारविन्स ग्रुपतर्फे देशभरातील ६० छायाचित्रकारांच्या ग्रे स्केल, फोटो स्टोरी, शॅडोज, हिस्टॉरिकल मोन्यूमेंटस‌, पॅटर्न या विषयांवरील २०० छायाचित्रांचा समावेश असणाऱ्या ‘क्षण'' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदाचे आठवे वर्ष आहे. लोकांच्या आयुष्यात आनंदी क्षण फुलविणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांना या प्रदर्शना दरम्यान ‘क्षण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
कधी ः शुक्रवार (ता. २१) ते रविवार (ता. २३)
केव्हा ः सकाळी १० ते रात्री ८
कुठे ः राजा रवी वर्मा कलादालन, घोले रस्ता

३) ‘नृत्यकथी’
‘नुपूरनाद’ संस्थेतर्फे शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा ‘पंचकन्या : एक नृत्यकथी’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. आयोजन करण्यात आले आहे. हा संवाद नृत्याचा अभिनव कार्यक्रम ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यकलाकार डॉ. स्वाती दैठणकर या एकल प्रकारात स्वतःच्या हिंदी कविता म्हणत सादर करणार आहेत. अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी या पंचकन्यांवर आधारित हा कार्यक्रम आहे.
कधी ः शनिवार (ता. २२)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता

४) ‘शब्द-सुरांच्या काठावर’
आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर, कवी मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर या प्रतिभावान लेखकांच्या तसेच स्वरचित रचनांसह गप्पा-गाण्यांची अनोखी मेजवानी ‘शब्द-सुरांच्या काठावर’ या मैफलीद्वारे रसिकांना अनुभवता येणार आहे. सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ही काव्यसंगीताची मैफल कवयित्री रेश्मा कारखानीस आणि गायक राजेश दातार सादर करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २२)
केव्हा ः सायंकाळी ६ वाजता
कुठे ः माधवराव पटवर्धन सभागृह, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam: "पवारांनी काँग्रेसकडं प्रस्तावही ठेवला होता की, सुप्रिया सुळेंना..."; विलिनीकरणाच्या विधानावर निरुपम यांचा खळबळजनक खुलासा

Loksabha election 2024 : ''...तर हे राम मंदिराला कुलूप ठोकतील'', अमित शाह नेमकं काय म्हणाले?

Share Market Closing: शेअर बाजार आजही सपाट बंद; सेन्सेक्स-निफ्टीमध्ये रिकव्हरी, कोणते शेअर्स तेजीत?

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Latest Marathi News Live Update : पवईत ४ कोटी ७० लाखांची रोकड पकडली

SCROLL FOR NEXT