पुणे

‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धेचे काँग्रेसतर्फे आयोजन

CD

पुणे, ता. २५ : ‘‘राजकारणात येऊ पाहणाऱ्या युवकांमधील प्रतिभेला चालना देण्यासाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाला लवकरच सुरुवात होईल,’’ अशी माहिती युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरितवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

हरिद्वाल म्हणाले, ‘‘देशातील प्रश्नांवर आवाज उठवू शकणाऱ्या युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१९ मध्ये ‘यंग इंडिया के बोल’ हे व्यासपीठ सुरू झाले. ‘यंग इंडिया के बोल’ ही एक भाषण आणि वादविवाद स्पर्धा आहे, ज्यात सबंध देशातून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतील. आलेल्या अर्जाची छाननी करून जिल्हास्तरीय स्पर्धा घेतली जाते. स्पर्धेची भाषेचे माध्यम हिंदी, इंग्लिश आणि सर्व प्रादेशिक व स्थानिक भाषा मध्ये असते. त्यासाठी स्पर्धक स्वतः आपली भाषा निवडू शकतात. ‘यंग इंडिया के बोल’ची अंतिम स्पर्धा दिल्ली येथे होईल. त्यामध्ये राज्यस्तरीय विजेते स्पर्धक भाग घेतात आणि भाषण वादविवाद व क्रिएटिव भाषण या श्रेणीमध्ये विजेता घोषित केला जातो.’’ या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, सरचिटणीस अक्षय जैन, प्रदेश प्रवक्ते दीपक राठोड, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाठ, मध्य प्रदेश प्रभारी ऐश्वर्या भद्रे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT