पुणे

चुकवू नये असे काही

CD

चुकवू नये असे काही : सदर
१) संगीत कार्यक्रम
सर्वेश इव्हेंट्स आणि मनमंजिरी म्युझिक फाउंडेशन प्रस्तुत ‘लीलाताई जळगांवकर संगीत समारोह’ आयोजित केला आहे. यात पहिल्या दिवशी श्रुती देशपांडे यांचे शास्त्रीय गायन, पं. राजेंद्र कुलकर्णी (बासरी), सुरेश फडतरे (हार्मोनिअम), हनुमंत फडतरे (तबला) यांचे सहवादन होईल. तर दुसऱ्या दिवशी प्राची कर्णिक यांचे गायन, निखिल पटवर्धन यांचे सतारवादन, पं. हेमंत पेंडसे यांचे गायन होईल.
केव्हा : शनिवारी (ता.२९) आणि रविवारी (ता.३०)
कधी : सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : मित्रमंडळ सभागृह, गणपती मंदिर, कल्याणीनगर
..........
२) अल्लारखाँ जयंती संगीत कार्यक्रम
सा व नी सूरसंगीत या संस्थेतर्फे उस्ताद अल्लारखाँ यांच्या जयंतीनिमित्त ‘अल्लारखाँ संगीत कार्यक्रम’ आयोजित केला आहे. यात पं. अजय चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. उस्ताद अहमदजाँन थिरकवा यांचे नातू उस्ताद रशीद मुस्तफा थिरकवाँ आणि चिरंजीव शारीक मुस्तफा यांचे तबला सहवादन होणार आहे. ओमकार इंगवले यांचे शास्त्रोक्त ढोलकी वादन होईल.
केव्हा : शनिवारी (ता. २९)
कधी : सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट
..........
३) अभिव्यक्ती
शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेतर्फे आयोजित ‘पुणे डान्स सीझन -२०२३’ नृत्य महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ‘अभिव्यक्ती’ हा अनोखा आविष्कार साकारण्यात येणार आहे. यात ज्येष्ठ नृत्यगुरु डॉ. सुचेता भिडे-चापेकर, मनीषा साठे, शमा भाटे या त्रिमूर्ती शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत. जागतिक नृत्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम होणार आहे.
केव्हा : शुक्रवारी (ता. २८)
कधी : सायंकाळी ६ वाजता
कुठे : बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड
......
४) ‘जी.एं’च्या कथा अभिवाचनासह साभिनय सादरीकरण
निर्माण नाट्य संस्थेच्या ४५ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘जी.एं.च्या कथा अभिवाचनासह साभिनय सादरीकरण’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. याचे दिग्दर्शन रवींद्र देशपांडे यांनी केले असून योगेश तपस्वी, स्मिता लाटे, विद्या भागवत, अंजली वांबुरकर, संध्या देशपांडे, कौस्तुभ भालेराव, संगीता रामदासी, विकास हांडे, अनघा गोखले, हितेश जकातदार सादरीकरण करतील. कार्यक्रमास सुश्रुत देशपांडे यांचे संगीत संयोजन असेल.
केव्हा : सोमवारी (ता. १)
कधी : सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत
कुठे : सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT