पुणे

दिव्यांग, ज्येष्ठांना मिळाला आधार

CD

पुणे, ता. २६ ः पुणे रेल्वे स्थानकावर व्हीलचेअरअभावी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय आता थांबणार आहे. ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर रेल्वे प्रशासनाला जाग आली असून, ३० व्हीलचेअर उपलब्ध करण्यात येणार आहेत. बुधवारी ५ व्हीलचेअर उपलब्ध केल्या असून, उर्वरित २५ येत्या १५ दिवसांत उपलब्ध होतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दीड लाखाहून अधिक प्रवासी रोज पुणे स्थानकावरून प्रवास करतात. यात दिव्यांग व ज्येष्ठांची संख्यादेखील जास्त असते. मात्र स्थानकावर केवळ एकच व्हीलचेअर असल्याने प्रवाशांना व त्यांच्या नातलगांना व्हीलचेअरची वाट पाहत बसावे लागत होते. अनेकदा ज्येष्ठ मंडळी कुणाचा तरी आधार घेत आपल्या वेदनेचा ‘प्रवास’ करत होते. दैनिक ‘सकाळ’ने ही बाब उजेडात आणताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी तत्काळ याची दखल घेत संबंधित वाणिज्य विभागाला व्हीलचेअर उपलब्ध करण्याची सूचना दिली. त्यानुसार वाणिज्य विभागाने बुधवारी सकाळीच ५ व्हीलचेअरची सोय केली, तर उर्वरित २५ येत्या दहा ते पंधरा दिवसांत उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची अडचण दूर होणार आहे. त्यांना व्हीलचेअरसाठी वाट पाहावी लागणार नाही. पुणे स्थानकावर २४ तासांत सुमारे ७० ते ७५ प्रवाशांकडून व्हीलचेअरची मागणी होते. आता त्या सर्वांना मोफत व्हीलचेअर उपलब्ध होणार आहेत.

तत्काळ पाच व्हीलचेअर उपलब्ध केल्या आहेत, आणखी २५ व्हीलचेअर येत्या दहा ते पंधरा दिवसांत उपलब्ध होतील. यामुळे दिव्यांग व ज्येष्ठांची सोय होणार आहे.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT