मणक्याचा विकार हा दोन प्रकारांनी होतो, फिजिओलॉजिकल व मेकेनिकॅल. फिजिओलॉजिकल मणक्याचा विकार हा आहार, शरीर भाव आणि मानस भाव बिघडणे, शरीरातील वात, पित्त व कफ या दोषांचे असमतोल यामुळे होतो. आहार-भूक लागल्यानंतर जेवण करावे. परंतु रुग्ण वेळ झाली म्हणून जेवण करतात. जेवणात गोड पदार्थ सुरवातीला खावे, आंबट पदार्थ जेवणाच्या मध्ये खावे, तिखट, तुरट आणि कडू पदार्थ जेवणाच्या शेवटी खावेत. याचा क्रम चुकला तर अपचन, अजीर्ण आम तयार होतो. त्यामुळे मणक्यात, कंबरेत सांध्यात वेदना होतात. सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे हे मणक्याचे विकाराचे एक कारण. पोट साफ न होणे, पोट जड होणे, किडनी स्टोन, सततचा ताप, कॅन्सर, स्त्रियांचे विकार त्यामुळे पाठदुखी होते. सततचा ताणतणाव, अतिविचार यामुळे मज्जातंतूवर दाब वाढल्यामुळे मणक्याचे विकार होतात.
मेकॅनिकॅल पाठदुखी-चकती, गादी, मणके पुढे, मागे, उजवीकडे, डावीकडे, वर-खाली सरकल्यामुळे पाठदुखी होते. निसर्गाने दिलेली शरीररचना तशीच राहावी ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. जगभरात विना शस्त्रक्रिया पाठदुखी मणक्याच्या विकारासाठी संशोधन चालू असून ते सिद्ध झाले आहे.
डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निकमध्ये उपचार पद्धती
भारतात मर्म आयुर्वेद पंचकर्म योग चिकित्सा उपलब्ध आहे. आयुर्वेद हे भारताचे प्राचीन शास्त्र. पथ्य, आहार विहार, मानसिक भाव, औषधी चिकित्सा व पंचकर्म चिकित्सा यांचा अवलंब केल्यास रुग्णास नक्की फायदा होतो. अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. डॉक्टर भंडारी स्पाइन टेक्निक याठिकाणी सर्व उपचार पद्धतीचा संगम केलेली प्राचीन ते आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. कोणताही रुग्ण आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा, दर्शन परीक्षा यामुळे निदान होते. तसेच अमेरिकन मशिनमुळे नक्की कोणत्या मणक्याच्या चकत्या सरकल्या आहेत, ते समजते. त्यामुळे उपचाराची नक्की दिशा समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.