पुणे

जागतिक नृत्य दिनानिमित्त कार्यक्रम

CD

पुणे ः जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘नृत्य कला आविष्कार अकादमी’च्या संचालिका अनुया जोशी यांनी नांदेड सिटी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नृत्यसाधना कार्यक्रमाद्वारे भरतनाट्यम नृत्यशैलीतील विविध नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी नटराज पूजन झाले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी नटेश कौतुवंम, आलारीपू, जतिस्वरंम सादरीकरण केले. गुरू अनुया जोशी यांनी सरस्वती वंदना सादर केली. नृत्यगुरु अपर्णा धुपकर यांनी नृत्याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. शिव कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या क्रांती पेटकर यांनी उपस्थित विद्यार्थिनी आणि पालकांना ‘भारतीय स्त्रियांचा शौर्यशाली इतिहास, महिलांची सध्याची असुरक्षितता आणि त्यावरील उपाय’ या विषयावर मार्गदर्शन केले.


महाराष्ट्र दिनी हेरिटेज वॉक व इतिहास कट्टा
पुणे ः महाराष्ट्र दिनानिमित्त ‘सेव्ह हेरिटेज’, ‘इतिहास प्रेमी मंडळ’ आणि ‘इमॅजिन रोटरी’ यांच्यातर्फे हेरिटेज वॉक व इतिहास कट्टा या उपक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजता नवी पेठेतील श्रीमंत नानासाहेब पेशवे समाधी येथे या उपक्रमाची सुरूवात होणार आहे. याप्रसंगी पर्यटन संचालयनाच्या उपसंचालक सुप्रिया करमळकर-दातार, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, शाहीर हेमंत मावळे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच, लेखक संतोष सातपुते यांचे व्याख्यान होणार आहे.


‘निवडक पालकनीती’ पुस्तकाचे प्रकाशन
पुणे ः पालकनीती मासिकात प्रकाशित झालेल्या निवडक लेखांतून साकारलेल्या ‘निवडक पालकनीती’-भाग १ व २ या पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन झाले. १९८७ ते २०१४ या काळात पालकनीतीत प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. प्रकाशन समारंभात ‘शिक्षा, स्पर्धा आणि धर्म याबाबत मुलांशी वागताना आपले नेमके धोरण काय असावे?’ या विषयावर चर्चासत्र झाले. वैशाली गेडाम, सजीता लिमये, मधुरा राजवंशी, सचिन नलावडे या तरुण शिक्षणकर्मींनी चर्चेत भाग घेतला. त्यांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. नवनिर्मितीच्या समन्वयक गीता महाशब्दे आणि पालकनीतीच्या संस्थापक संजीवनी कुलकर्णी यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT