Implement pay commission for retired teachers by end of May Chandrakant Patil education
Implement pay commission for retired teachers by end of May Chandrakant Patil education sakal
पुणे

Pune : "निवृत्त शिक्षकांना लागू होणार वेतन आयोग", पालक मंत्र्यांचे पालिकेला आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘महापालिकेच्या शिक्षण विभागातून १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून त्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे द्या,’’ असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील महापालिकेला दिले आहेत.

सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगासंदर्भात पाटील यांनी सोमवारी (ता. ८) बैठक आयोजित केली होती. आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. मिनाक्षी राऊत, महापालिका सेवानिवृत्त सेवक संघाचे अध्यक्ष संभाजी भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या सेवेतून १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर अशा ३५० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत विवरणपत्रे तयार केलेली आहेत. २०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १० महिन्याचा फरक व वेतन आयोगाचा पहिला हप्ता दिला आहे, त्याच प्रमाणे २०१६ पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभ देण्यात आले आहेत, अशीही माहिती मनपाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

उर्वरित सर्व कामे तातडीने पूर्ण करून मे अखेरपर्यंत सातवा वेतन आयोगानुसार वाढीव निवृत्तिवेतन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना द्यावे. तसेच दोन महिन्यांनंतर सेवा उपदानाची रक्कम देखील द्या, अशी सूचना पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली.

पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण
समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बाणेर-बालेवाडी भागातील नागरिकांचा पाण्याच्या सोडविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होत आले आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण १७ मे रोजी करण्याचे आदेश पाटील यांनी दिले.

‘नागझरी नाल्याभोवतीची अतिक्रमणे तत्काळ काढा’

‘‘शहराच्या मध्यवस्तीतून नागझरी नाला वाहतो. त्याच्या बाजूला असलेल्या नागरिकांच्या घरांत नाल्याचे पाणी गेल्यामुळे त्यांचे जनजीवन विस्कळीत होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण आणि स्वच्छता जून महिनाअखेर पूर्ण करा. नाल्याभोवती असलेली अतिक्रमणे तत्काळ काढा,’’ असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. नागझरी नाल्यातील पूरपरिस्थितीबाबत पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते, त्या वेळी त्यांनी हे आदेश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT