पुणे

‘सीबीएसई’च्या निकालात घट

CD

पुणे, ता. १२ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत ८७.३३ टक्के, तर दहावीच्या परीक्षेत ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीचा निकालात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५.३८ टक्क्यांनी, तर दहावीच्या निकालात १.२८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येते.
‘सीबीएसई’ने नेहमीप्रमाणे यंदाही कोणतीही पूर्व सूचना न देता अचानकपणे शुक्रवारी सकाळी बारावीचा आणि दुपारी दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला. देशभरातील २८ हजार ४७१ शाळांमधील, तर देशाबाहेरील २६ देशांमधील शाळांच्या जवळपास ३८ लाख ८२ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेला नोंदणी केली. यंदा २१ लाख ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी दहावीची, तर १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली.
दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते २१ मार्च दरम्यान घेण्यात आली. देशभरातील २४ हजार ४८० शाळांमधील २१ लाख ८४ हजार ११७ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील २१ लाख ६५ हजार ८०५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २० लाख १६ हजार ७७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा निकाल १.९८ टक्क्यांनी अधिक आहे. तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते पाच एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. देशभरातील १६ हजार ७२८ शाळांमधील १६ लाख ८० हजार २५६ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यातील १४ लाख ५० हजार १७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींचा निकाल ६.०१ टक्क्यांनी अधिक आहे.

पुणे विभागाचा निकाल
‘सीबीएसई’च्या पुणे विभागात महाराष्ट्र, गोवा, दीव-दमण, दादरा आणि नगर हवेली समाविष्ट आहे. त्यानुसार पुणे विभागातील दहावीची परीक्षा दिलेले ९६.९२ टक्के विद्यार्थी, तर बारावीचे ८७.२८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

पुढीलवर्षी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२४मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तारीखही जाहीर केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारी २०१४ या एकाच दिवशी सुरू होणार असल्याची माहिती ‘सीबीएसई’तर्फे देण्यात आली आहे.

नव्वदीपार विद्यार्थ्यांची संख्या
तपशील : दहावी : बारावी
९५ टक्के आणि त्याहून अधिक गुण : ४४,२९७ : २२,६२२
९० टक्के आणि त्याहून अधिक गुण : १,९५,७९९ : १,१२,८३८

दहावी-बारावीच्या निकालातील आकडेवारी
तपशील : दहावी : बारावी
नोंदणी केलेले विद्यार्थी : २१,८४,११७ : १६,८०,२५६
परीक्षा दिलेले विद्यार्थी : २१,६५,८०५ : १६,६०,५११
उत्तीर्ण विद्यार्थी : २०,१६,७७९ : १४,५०,१७४
उत्तीर्णतेची टक्केवारी : ९३.१२ टक्के : ८७.३३ टक्के

परदेशातील शाळांमधील निकालाचा तपशील
इयत्ता : नोंदणी केलेले : परीक्षा दिलेले : उत्तीर्ण झालेले : उत्तीर्णतेची टक्केवारी
बारावी : १९,६०७ : १९,४२० : १७,९८१ : ९२.५९ टक्के
दहावी : २५,३९१ : २५,१८६ : २४,६६७ : ९७.९४ टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT