पुणे

जिल्ह्यात तळेगाव ढमढेरे सर्वाधिक उष्ण

CD

पुणे, ता. १२ ः पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण गाव म्हणून शुक्रवारी (ता. १२) शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गावाची नोंद झाली आहे. या गावात जिल्ह्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून शिरूरची नोंद झाली आहे. शिरूरचे आजचे तापमान ४३.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे.
हवामान विभागाने पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक तापमान असलेली गावे व शहरांची यादी जाहीर केली. यामध्ये किमान ३५ अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमान नोंदल्या गेलेल्या गावांचा समावेश केला आहे. सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली अनुक्रमे तीन गावे (शहरांसह) ही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील असल्याचे या यादीवरून स्पष्ट झाले आहे. किमान ४० अंश सेल्सिअस आणि त्याहून अधिक तापमान असलेल्यांमध्ये तळेगाव ढमढेरे, शिरूर, राजगुरुनगर, डुडुळगाव (पिंपरी चिंचवड), लवळे (ता. मुळशी), पुरंदर, कोरेगाव पार्क व वडगाव शेरी (दोन्ही पुणे शहर), दौंड, आंबेगाव, चिंचवड, गिरीवन (ता. मुळशी), शिवाजीनगर, हडपसर, पाषाण व एनडीए परिसर (सर्व पुणे शहर) आणि बल्लाळवाडी आदी गावे व शहरांचा समावेश आहे.
दरम्यान, शुक्रवारी पुणे शहरातील सर्वाधिक तापमानाची नोंद कोरेगाव पार्क या परिसरात झाली आहे. येथील तापमानाचा पारा ४१.८ अंश सेल्सिअसवर गेला आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक उष्ण गावे
- तळेगाव ढमढेरे --- ४३.८ अंश सेल्सिअस
- शिरूर --- ४३.४
- राजगुरुनगर --- ४२.२
- डुडुळगाव --- ४२.००
- लवळे (ता. मुळशी) --- ४२.००
- पुरंदर --- ४१.९
- कोरेगाव पार्क --- ४१.८
- वडगावशेरी --- ४१.८
- दौंड --- ४१.२
- आंबेगाव --- ४१.२
- चिंचवड --- ४०.८
- गिरीवन (ता. मुळशी) --- ४०.८
- शिवाजीनगर --- ४०.८
- हडपसर --- ४०.५
- पाषाण --- ४०.२
- बारामती --- ४०.२
- एनडीए --- ४०.१
- बल्लाळवाडी (ता. जुन्नर) --- ४०.०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT