पुणे

‘अभाविप’ची पुण्यात राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक

CD

पुणे, ता. १६ : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक २५ ते २८ मे दरम्यान पुण्यात होणार आहे. या परिषदेसाठी देशभरातून संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

‘अभाविप’च्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार, प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. शरद गोस्वामी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या वेळी स्वागत समितीचे अध्यक्ष म्हणून ‘भारत फोर्ज’चे व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी, उपाध्यक्ष म्हणून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष संजय चोरडिया व उद्योजक प्रकाश धोका यांची तर बागेश्री मंठाळकर यांची स्वागत समिती सचिव व राहुल पांगरीकर यांची सहसचिव म्हणून घोषणा करण्यात आली.

ही परिषद कर्वेनगर येथील महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात होणार आहे. २५ मे रोजी सायंकाळी ५ वाजता संघटनेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्‍य शुक्‍ला यांच्या हस्ते परिषद होणार आहे. या प्रसंगी राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चव्हाण कार्यक्रमासाठी उपस्थित असतील. २६ मे रोजी शुभारंभ लॉन्स येथे नागरिक समारोह होणार आहे. या वेळी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाबा कल्याणी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : दादर पूर्वच्या शिंदे वाडी येथून १.१४ कोटींची रोकड जप्त

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपट

SCROLL FOR NEXT