पुणे

मोफत रेशन कार्ड मिळणार राज्य सरकारचा निर्णय; सामान्यांना ऑनलाइन पद्धतीने मिळणार

CD

पुणे, ता. १८ : रेशनकार्ड (शिधापत्रिका) हवी आहे. त्यासाठी रेशन कार्यालयात जाण्याची, तेथे एजंटला धरून पैसे खाऊ घालण्याची गरज नाही. कारण, रेशन कार्ड हवे असल्यास ते आता ऑनलाइन आणि निःशुल्क (मोफत) उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

अनेक तहसील कार्यालयांमध्ये तसेच परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला होता. त्यात अनेक अधिकारी देखील सामील होते. त्यामुळे वीस रुपयात मिळणाऱ्या रेशन कार्डसाठी एक ते दोन हजार रुपयांपर्यंत मोजावे लागत होते. याला आता आळा बसणार आहे. राज्य सरकारने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. शासन निर्णयानुसार आता सामान्यांना ऑनलाइन पद्धतीने रेशन कार्ड काढता येणार आहे. त्यासाठी कोणतीही शुल्क द्यावे लागणार नाही. ऑनलाइन पद्धतीने अर्ज केल्यानंतर ही माहिती संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याकडे जमा होणार आहे. त्यानंतर अर्जदार हा नेमका कुठल्या प्रकारातील आहे, यावरून त्याचे रेशन कार्ड किती दिवसात मिळेल हे ठरणार आहे.
यावर रेशन कार्ड दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी म्हणाले, ‘‘रेशन कार्ड काढण्यासाठी पूर्वी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांसह एजंटांची लॉबी होती. या ऑनलाइन सुविधेमुळे ही लॉबी तुटणार आहे.’’

या कालावधीत मिळणार कार्ड
जर अर्जदार अंत्योदय योजनेतील किंवा राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील असल्यास पूर्वीप्रमाणेच त्यासाठी रेशन अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना त्याच्या कुटुंबाचा सर्व्हे करावा लागणार आहे. त्यामुळे असे रेशन कार्ड देताना पूर्वीचीच २० दिवसांची मुदत असणार आहे. पांढरे रेशन कार्ड काढायचे असल्यास त्याला पूर्वी सात दिवस लागायचे, आता देखील याच मुदतीत ते कार्ड मिळणार आहे. रेशन कार्ड मान्य झाल्यानंतर त्याला ते ऑनलाईनच डाउनलोड करता येणार आहे. त्यात त्याचे कार्ड कोणत्या दुकानदाराला नेमण्यात आलेला आहे. याचा देखील उल्लेख असणार आहे.

‘‘या निर्णयामुळे सामान्यांना होणारा त्रास वाचणार आहे. माहिती ऑनलाईनच उपलब्ध झाल्याने पुढील सोपस्कार कमी होणार आहेत.’’
- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drunk Driving Accident: कल्याणीनगरच्या आपघात प्रकरणी थातूरमातूर कारवाई? पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

SCROLL FOR NEXT