पुणे

चुकवू नये असे काही

CD

१) ‘चित्र लिपी’
आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त पारंपारिक भारतीय लोककलांच्या प्रदर्शनाचे आयोजित करण्यात आले आहे. ‘चित्र लिपी’ नावाच्या या प्रदर्शनात ज्येष्ठ कलाकार दिलीप पुराणिक यांच्या कलाकृती पाहायला मिळतील. या प्रदर्शनात मिथिला - मधुबनी, वारली, कलमकारी, गोंड लोककलांची अस्सल पारंपारिक स्वरूपातील रंगीत चित्रे पाहायला मिळतील.
कधी ः शनिवार (ता. २०) ते बुधवार (ता. २४)
केव्हा ः सकाळी ११ ते रात्री ८
कुठे ः पु. ना. गाडगीळ अँड सन्स आर्ट गॅलरी, हॅपी कॉलनी, कोथरूड

२) ‘बैठक’
अल्फा इव्हेंट्सतर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित ‌‘बैठक’ सांगीतिक मालिकेअंतर्गत वर्षभरात सहा उपक्रम घेतले जाणार आहेत. या मालिकेतील पहिले पुष्प ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अमरेंद्र धनेश्वर आणि जयपूर-अत्रौली घराण्याच्या युवा गायिका डॉ. राधिका जोशी गुंफणार आहेत. त्यांना व्हायोलिनवर प्रज्ञा देसाई, संवादनीवर लीलाधर चक्रदेव आणि तबल्यावर प्रणव गुरव साथसंगत करणार आहेत.
कधी ः शनिवार (ता. २०)
केव्हा ः सायंकाळी ५.३० वाजता
कुठे ः द बेस, एसएनडीटी समोर, एरंडवणे

३) ‘दीपक - अ सोर्स ऑफ लाइट
नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर आणि कथकनाद संस्थेतर्फे ‘दीपक-अ सोर्स ऑफ लाइट या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची सुरुवात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांच्या गायनाने होईल. त्यानंतर शुभम उगळे यांचे पखवाज वादन होईल. कार्यक्रमाचा समारोप प्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवालकर यांच्या शिष्यांच्या कथक नृत्य सादरीकरणाने होईल.
कधी ः रविवार (ता. २१)
केव्हा ः सकाळी १० ते दुपारी १
कुठे ः एमईएस बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पाऊसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT