पुणे

‘संगीत देवबाभळी’चे साक्षीदार होण्याची संधी

CD

पुणे, ता. १९ ः रसिकांनी-मान्यवरांनी गौरवलेले आणि पुरस्कारांची लयलूट केलेले, मराठी रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी.’ गेली पाच वर्षे रसिकांच्या मनात ‘देवबाभळी’चा काटा अलगद रूतवत त्यांचे रंजन करणारी ही कलाकृती आता मुक्कामाच्या वाटेवर निघाली आहे. या नाटकाचे आता शेवटचेच काही प्रयोग होणार असून त्यातील एक प्रयोग उद्या (ता. २०) ‘सकाळ नाट्य महोत्सवा’त होणार आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे रात्री ९.३० वाजता हा प्रयोग रंगणार आहे. त्यामुळे आजवर हे नाटक ज्यांनी पाहिले आहे, त्यांना ते परत अनुभवण्याची आणि ज्यांनी पाहिले नाही, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. भद्रकाली प्रॉडक्शन्सनिर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्राजक्त देशमुख यांनी केले आहे. शुभांगी सदावर्ते आणि मानसी जोशी यांनी नाटकातील दोन भूमिका साकारल्या आहेत.
विशेष म्हणजे, ‘सकाळ नाट्य महोत्सवा’तील प्रयोग असल्याने या नाटकाची तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. ही तिकिटे बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी ९.३० ते रात्री ९ या वेळेत तसेच, ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

‘सकाळ’शी माझे खूप जुने नाते आहे. कारण ‘सकाळ’च्या मधुरांगण या उपक्रमात मी बराच काळ सहभाग घेतला होता. सहा महिने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात दौरे केले होते. त्यावेळचा अनुभव अतिशय सुंदर होता. पुन्हा एकदा ‘सकाळ’च्या उपक्रमात सहभागी होण्याचा आनंद आहे. आमच्या ‘संगीत देवबाभळी’ नाटकाचे आता शेवटचे काही प्रयोग असल्याने थोडीशी हुरहूर आहेच, पण प्रत्येक प्रयोग आमच्यासाठी खास आहे.
- मानसी जोशी, अभिनेत्री

‘संगीत देवबाभळी’ हे नाटक सुरुवातील एकांकिकेच्या रूपात होते, तेव्हापासून मी त्याच्याशी जोडले गेले आहे. आज त्याचे चारशेपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. हा सगळा प्रवास मी अगदी जवळून पाहिला आहे. या नाटकातील भूमिकेने मला ओळख दिली. नाटक-चित्रपट क्षेत्रात स्थान निर्माण करण्यासाठी मदत झाली. त्यामुळे हे नाटक माझ्यासाठी अतिशय जवळचे आहे.
- शुभांगी सदावर्ते, अभिनेत्री

विद्यार्थ्यांना भरघोस सवलत
सकाळ नाट्य महोत्सवाच्या सर्वच तिकिटांवर सवलत देण्यात आली आहेच. मात्र विद्यार्थ्यांसाठीही भरघोस सवलत उपलब्ध आहे. प्रत्येक नाटकाच्या बाल्कनीतील तिकिटांवर विद्यार्थ्यांना तब्बल ५० टक्के सूट मिळणार आहे. यासह इतर सर्वच तिकिटांवरदेखील वीस टक्के सवलत देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: पावसाचा हाहाकार! पुढील 5 दिवस काळजीचे... या जिल्ह्यांना रेड अलर्ट! मुंबई-पुण्याची परिस्थिती कशी असेल?

PM मोदी जगातले सर्वात लोकप्रिय नेते; ट्रम्प अन् मेलोनींच्या रँकिंगमध्ये घसरण; कोण कितव्या स्थानी?

Child End Of Life : शाळा का चुकवतोस आईनं विचारलं, मुलाने थेट गळफासचं घेतला; नेमकं काय चुकलं

Latest Maharashtra News Updates : कऱ्हाडजवळ आजपासून महामार्गावर एकेरी वाहतूक, उड्डाणपुलाचे गर्डर उतरविण्यासाठी नियोजन

Latur Crime: ‘एचआयव्ही’बाधित मुलीवर अत्याचार; चार महिन्यांनी गर्भपाताचा आरोप, सहा संशयितांविरुद्ध गुन्हा

SCROLL FOR NEXT