पुणे

शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू

CD

पुणे, ता. २७ : शहरात वेगवेगळ्या अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. नगर रस्ता, लुल्लानगर आणि कात्रज घाट या ठिकाणी हे अपघात घडले.
नगर रस्त्यावर वाडेबोल्हाई परिसरात मोटारीच्या धडकेने रिक्षातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आकाश पांडुरंग धोत्रे (वय २७, रा. कोरेगाव पार्क) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत प्रवीण धोत्रे (वय २५, रा. कोरेगाव पार्क) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रवीण आणि त्याचा चुलतभाऊ आकाश हे गुरुवारी (ता. २५) नगर रस्त्याने रिक्षातून निघाले होते. त्यावेळी वाडेबोल्हाई परिसरात भरधाव मोटारीने रिक्षाला धडक दिली. आकाश गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला.
दुसऱ्या घटनेत, नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. विशाल ऋषीमुनी गौड (वय २३, रा. वाघोली) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत चंदन गौड (वय ३५, रा. मांजरी) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ट्रकचालक पसार झाला.
दरम्यान, रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कोंढव्यातील लुल्लानगर ते गोळीबार मैदान रस्त्यावर घडली. बाबू अनंतय्या मंगल (वय ४६, रा. लोहियानगर, गंज पेठ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. दुचाकीस्वार बाबू मंगल लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदान चौकाकडे निघाले होते. त्या वेळी त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडी कठड्यावर आदळली. अपघातात मंगल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शिवशाहीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
चौथी घटना कात्रज घाटात घडली. शिवशाही बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. रोहित मारुती वीर (वय २२, रा. कराड, जि. सातारा) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शिवशाही बसचालक संभाजी आत्माराम कुंभार (वय ३४, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस हवालदार सचिन पवार यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार रोहित वीर दुचाकीवरून कात्रज घाटातून निघाला होता. त्या वेळी भरधाव शिवशाही बसने त्याला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या रोहितचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक मोहन देशमुख अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT