पुणे

वैद्यकीय संशोधनात एकात्मिक दृष्टिकोन गरजेचा डॉ. माधुरी कानिटकर : ‘डायग्नॉस्टिका-रिव्होल्युशन इन हेल्थ केअर’ परिषदेचे आयोजन

CD

पुणे, ता. २८ : ‘‘वैद्यकीय क्षेत्रात संशोधनासाठी एकात्मिक दृष्टिकोन आवश्यक आहे. रोगनिदान आणि चिकित्सा या विषयांतील संशोधनामध्ये हा दृष्टिकोन ठेवणे ही काळाची गरज आहे,’’ असे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी येथे सांगितले.

टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘सेंटर फॉर पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीज अँड रिसर्च इन आयुर्वेद’ व ‘ॲकॅडमी ऑफ रोगनिदान’ यांच्यातर्फे ‘डायग्नॉस्टिका-रिव्होल्युशन इन हेल्थ केअर’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात डॉ. कानिटकर बोलत होत्या. या वेळी जामनगर येथील आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुकुल पटेल, ‘एनसीआयएसएम बोर्ड ऑफ एथिसिस अँड रिसर्च’चे अध्यक्ष डॉ. राकेश शर्मा आणि ‘ॲकॅडमी ऑफ रोगनिदान’चे सचिव सदस्य डॉ. अतुल वार्ष्णेय आदी उपस्थित होते. या परिषदेत एकूण ४०० डॉक्टरांनी सहभाग घेतला. या वेळी ‘डायग्नोस्टिक : इंटिग्रेटेड ॲप्रोच टू हेल्थ केअर’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.

आयुर्वेदातील संशोधनाबद्दल माहिती देताना भस्म औषधी  निर्माण, सर्पविषाचा त्यामधील उपयोग व उपयुक्तता तपासणीसाठीचा उंदरांमधील संशोधनाचा दाखला देत आयुर्वेद निदान व चिकित्सा करण्याविषयी डॉ. पटेल यांनी आग्रह धरला. या प्रसंगी संयोजक डॉ. सदानंद देशपांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. समन्वयक सचिव डॉ. मंजिरी देशपांडे यांनी परिषदेबद्दल माहिती दिली. जामनगर आयुर्वेद विद्यापीठाचे माजी कुलगुरू एम. एस. बघेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘बेस्ट थिसिस अवॉर्ड्स’ची घोषणा ‘ॲकॅडमी ऑफ रोगनिदान’चे अध्यक्ष डॉ. पवनकुमार गोदातवार यांनी केली. म्रिदू बघेल यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक यांनी शतक महोत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती दिली. डॉ. जाई किणी सहसंयोजक होत्या. डॉ. सुनील पांढरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT