पुणे

मोफत सुविधांचा रुग्णालयांना ‘ताप’

CD

पुणे, ता. २४ : शासकीय रुग्‍णालयांमध्‍ये मोफत उपचार सुरू केल्‍यापासून येथे उपचार घेणाऱ्या रुग्‍णांच्‍या संख्‍येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्‍याचबरोबर तपासण्‍या, औषधे देखील मोफत असल्‍याने तपासण्‍यांमध्‍येही वाढ झाली आहे. त्‍यामध्‍ये बहुतांश रुग्‍ण हे जरी गरज असलेल्‍या उपचारांसाठी येत असले तरी काहीजण गरज नसतानाही तपासण्‍या करण्‍याचा आग्रह धरतात. त्यामुळे रुग्‍णांच्‍या बाबतीतही हवे ‘फुकट ते पौष्टिक’ या म्‍हणीचा प्रत्‍यय शासकीय रुग्‍णालयांना येत आहे. सेवा मोफत झाल्‍यापासून जिल्‍हा रुग्‍णालयात बाह्यरुग्ण विभाग, एक्‍स रे, सोनोग्राफी, ईसीजी तपासण्‍यांमध्‍ये नऊ ते ३५ टक्‍के वाढ झाली आहे.

राज्‍यात ग्रामीण भागांमध्‍ये गाव पातळीवर आरोग्‍य उपकेंद्र, मोठ्या लोकवस्‍तीच्‍या गावांच्‍या ठिकाणी प्राथमिक आरोग्‍य केंद्र व तालुक्‍याच्‍या ठिकाणी ग्रामीण रुग्‍णालय आहे. तसेच दाट लोकवस्‍तीच्‍या ठिकाणी उपजिल्‍हा रुग्‍णालय आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्‍हा रुग्‍णालय अशी आरोग्‍य विभागाच्‍या उपचारांची रचना आहे. ही रुग्‍णालये शहराच्‍या जवळ असल्‍याने तेथे शहरातील रुग्‍णदेखील उपचार घेतात. औंधमधील जिल्‍हा रुग्‍णालय सोईस्कर असल्याने तेथे बऱ्यापैकी शहरातील रुग्‍ण उपचारांसाठी जातात. सरकारी रुग्‍णालयांत सर्व प्रकारचे मोफत उपचारांचा निर्णय आरोग्‍यमंत्री तानाजी सावंत यांनी घेतला होता. त्‍याची अंमलबजावणी १५ ऑगस्‍ट २०२३ पासून संपूर्ण राज्‍यात करण्‍यात आली. तेव्‍हापासून रुग्‍णसंख्‍या वाढल्‍याचे दिसून येत आहे. तसेच तपासण्‍यांमध्‍येही वाढ झाली आहे. याला अपवाद हा आंतररुग्‍ण विभागाचा असून येथील दोन्‍ही वर्षांची रुग्‍णसंख्‍या मात्र स्थिर आहे.

जिल्‍हा रुग्‍णालयातील वाढलेली रुग्‍णसंख्या
रुग्णसंख्‍या / तपासण्‍या – ऑगस्‍ट २०२२ ते जुलै २०२३ (सशुल्‍क) – ऑगस्‍ट २०२३ ते जुलै २०२४ (मोफत) – वाढलेली टक्‍केवारी
- बाह्यरुग्ण विभागातील रुग्‍ण – २ लाख ९९ हजार २१७ – ३ लाख २७ हजार ५४५ – ९ टक्‍के
- आंतररुग्‍ण विभाग – १७ हजार २३० – १७ हजार १४८ – बदल नाही
- ईसीजी तपासणी – १९ हजार ८५४ – २५ हजार ८९४ – २१ टक्‍के
- सोनोग्राफी तपासणी – १९ हजार ७२७ – २३ हजार ८९ – १५ टक्‍के
- एक्‍स रे तपासणी – ३८ हजार १२४ – ५८ हजार १०७ – ३५ टक्‍के


जिल्‍हा रुग्‍णालयात मोफत सेवा केल्यापासून रुग्‍णसंख्‍या वाढली आहे. येथे केस पेपरपासून औषधे, रक्‍त तपासण्‍या, निदान सेवा, शस्त्रक्रिया, आंतर रुग्‍ण सेवा आदी आरोग्य सुविधा मोफत आहे. रुग्‍णालयातील डॉक्‍टर रुग्‍णांची तपासणी करून त्‍यांना पुढील तपासण्‍यांची, निदान सेवांची गरज आहे किंवा नाही हे सांगतात. मात्र रुग्णांनी विनाकारण तपासण्यांचा आग्रह करू नये.
- डॉ. नागनाथ यमपल्‍ले, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक, जिल्‍हा रुग्‍णालय, औंध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीत सुरू होणार मोठं मिशन; भारतात का येतेय ही अवकाश गुप्तचर कंपनी? छोट्या उपग्रहांची मोठी तयारी

IND vs SL 2nd Test: भन्नाट,भन्नाटssss! यशस्वी जैस्वालचा हा कॅप पाहाच, श्रीलंकेच्या ओपनरला झोप लागली नसेल Video Viral

Devendra Fadnavis: महिला आरक्षण २०३४ पर्यंत ढकलण्याचा प्रयत्न; विरोधक महिलांना आरक्षणापासून रोखताहेत, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

Marathi News Live Updates : साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Raju Shetty: देशात ४८ लाख टन साखर गायब; २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप, प्रतिटन ५ हजार रुपये द्यावेत

SCROLL FOR NEXT