पुणे

वीस रुपयांत चहा, कॉफी, पाणी

CD

पुणे, ता. १९ ः पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण नवीन टर्मिनलमध्ये खाद्यपदार्थाचे स्टॉल दोन दिवसांत सुरू होत आहेत. या स्टॉलवर प्रवाशांना अवघ्या २० रुपयांत पाण्याची बॉटल, चहा व कॉफी उपलब्ध असेल. तर वडापाव, पॅटिससारखे पदार्थ कमी दरात उपलब्ध होणार आहेत. स्नॅकचे दर ३० ते ४० रुपये असणार आहेत. नवीन टर्मिनलच्या प्रस्थान गेटजवळ हा स्टॉल असणार आहे.
पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलमधील खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर चहा सुमारे २०० रुपयांना तर पाण्याची बाटली ६० ते ८० रुपयांना विक्रीस आहे. हा दर जास्त असल्याने प्रवाशांनी काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर नाराजीदेखील व्यक्त केली आहे. सरकारने अनुदान देत सामान्य प्रवाशांसाठी ‘उडान’ योजना सुरू केली आहे. मात्र टर्मिनलवरचे चहा, कॉफीचे दरदेखील सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. जुन्या टर्मिनलमध्ये एका स्टॉलवर कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध आहे. नवीन टर्मिनलवर मात्र सध्या एकही स्टॉलवर कमी किमतीत पदार्थांची विक्री केली जात नाही. त्यामुळे काही प्रवाशांनी कमी किमतीत चहा, कॉफी उपलब्ध करण्याची मागणी केली होती. ती आता पूर्ण होत आहे. सध्या नवीन टर्मिनलवर १२० विमानांची वाहतूक होत आहे. येत्या काही दिवसांत विमानांची वाहतूक वाढणार आहे.

सामान्य प्रवाशांसाठी नवीन टर्मिनलवर एक स्टॉल सुरू केले जात आहे. तिथे मिळणाऱ्या पदार्थांचे दरदेखील निश्‍चित केले आहेत. प्रवाशांना माफक दरात चहा, कॉफी व पाण्याची बॉटल घेता येईल.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT