Pune Water Shortage
Pune Water Shortage Sakal
पुणे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! दीड महिना पुरेल एवढेच पाणी शिल्लक, मे, जूनमध्ये तीव्र टंचाईचा धोका?

सकाळ वृत्तसेवा

Pune Water Shortage

पुणे : पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून सध्या केवळ ९.४३ टीएमसी इतका अल्प साठा आहे. या पाण्याचे होणारे संभाव्य बाष्पीभवन, दौंड शहरासाठी आणि शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास पुणे शहराला जेमतेम ४० दिवस पुरेल एवढाच हा पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. अन्यथा येत्या मे व जून या दोन महिन्यांत पुणेकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याचे संकट निर्माण झाले आहे.

पुण्याला खडकवासला प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चार धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा २९.१५ टीएमसी आहे. यापैकी सध्या या धरणांत सध्या केवळ ९.४३ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या २१ एप्रिल २०२३ तारखेला या चार धरणांमध्ये मिळून एकूण १२.८४ टीएमसी पाणीसाठा होता. यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा चार धरणांमधील एकूण पाणीसाठा यंदा २.७४ टीएमसीने कमी झाला आहे.

खडकवासला प्रकल्पातील उपलब्ध पाणीसाठ्यापैकी शहराला पिण्यासाठी सुमारे तीन टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणारा हा पाणीसाठा शहराला आणखी केवळ दीड महिना पुरेल इतकाच आहे. जलसंपदा विभागाने पुणे शहराला पिण्यासाठी वर्षाला १४.६१ टीएमसी पाणी कोटा मंजूर केलेला आहे. प्रत्यक्षात एका वर्षाला २०.४९ टीएमसी पाणी पुणेकर वापरत आहेत. यानुसार दरमहा सरासरी १.७० टीएमसी पाणी हे पुणेकरांसाठी लागत असते. त्यातच आता उपनगरांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आणखी २३ गावे ही महापालिकेत समाविष्ट झाली आहेत.

या पार्श्‍वभूमीवर पुणे शहराला दरमहा दोन टीएमसीहून अधिक पाणी लागत आहे. यानुसार सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा हा फार फार तर मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरू शकणार असल्याचे जलसंपदा विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Pune Water Tanker

धरणनिहाय पाणीसाठा

  • एकूण ९.४३ टीएमसी (३२.३६ टक्के)

  • टेमघर ०.२७ (७.२० टक्के)

  • वरसगाव ४.७७ (३७.२२ टक्के)

  • पानशेत ३.३१ (३१.०९ टक्के)

  • खडकवासला १.०८ (५४.९४ टक्के)

खडकवासला प्रकल्पातील पाण्याची स्थिती (टीएमसीमध्ये)

  • प्रकल्पातील एकूण उपयुक्त पाणीसाठा : २९.१५

  • सध्या उपलब्ध असलेला साठा : ९.४३

  • शहराला मंजूर पाणी कोटा (वार्षिक) १४.६१

  • प्रत्यक्षात वापरले जाणारे पाणी (वार्षिक) २०.४९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT