घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस धोकादायक पद्धतीने काढून त्याची छोट्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.
घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस धोकादायक पद्धतीने काढून त्याची छोट्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला.  Sakal
पुणे

Pune News : सिलिंडरमधील गॅस काढून विक्रीचा प्रकार उघड

सकाळ वृत्तसेवा

Pune News : घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस धोकादायक पद्धतीने काढून त्याची छोट्या व्यावसायिक सिलिंडरद्वारे विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, चौघांना अटक केली आहे.

वेगवेगळ्या गॅस कंपनीच्या १०६ सिलिंडरसह लाखो रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गणेश दिलीप भोईटे (वय २७), सुनील पंडित आकळे (वय ३५), निरंजन अंकुश आकळे (वय २०) देविदास शंकर आकळे (वय २५, सर्व रा. पानसरे नगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलिस अंमलदार सर्फराज देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून संशयित आरोपींविरुद्ध जीवनावश्‍यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रूक येथील पानसरे नगरमधील एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने घरगुती सिलिंडरमधील गॅस छोट्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जात असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांच्या पथकाने रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी छापा घातला. त्यावेळी चौघेजण १९ किलो वजनाच्या घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस काढून तो चार किलो वजनाच्या छोट्या सिलिंडरमध्ये बेकायदेशीरपणे व धोकादायक पद्धतीने गॅस भरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी चौघांना तत्काळ अटक केली.

त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चारचाकी वाहने, गॅस सिलिंडर टाक्‍या, एचपी गॅस कंपनीचे निळ्या रंगाचे ५७, भारत गॅस कंपनीचे ४६ व अन्य ३ असे एकूण १०६ सिलिंडर, गॅस ट्रान्स्फर पाइप, इलेक्‍ट्रीक वजनकाटे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अन्‌ मोठी दुर्घटना टळली

कात्रज येथे एक ते दीड वर्षापूर्वी बेकायदेशीरपणे व धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरमधून विक्रीसाठी छोट्या गॅस सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना स्फोट झाला होता. प्रचंड तीव्रतेच्या या स्फोटामुळे नागरिकांमध्ये अक्षरशः भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर शहरात बेकायदेशीरपणे गॅस विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाली, मात्र त्यानंतर ही कारवाई थंडावली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोंढव्यातील बेकायदेशीर गॅस विक्रीचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT