पुणे

उद्योग विकासासाठी ‘टॉप बिझनेस पीपल मिक्सर’

CD

पुणे, ता. २८ ः शहरातील वैविध्यपूर्ण उद्योग क्षेत्राला एकत्र आणण्याचे काम ‘टॉप बिझनेस पीपल मिक्सर’ या व्यासपीठाने केले. विशेष म्हणजे यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘रिसर्च पार्क फाउंडेशन’चाही पुढाकार आहे. उद्योजकांचे हे पहिले एकत्रीकरण नुकतेच विद्यापीठातील मुख्य इमारतीत पार पडले. यात रिसर्च पार्कबरोबरच फूड सीड टेक व्हीसी फंड (एफएसटी) आणि व्हिक्टरी व्हर्स व्हीसी फंड (व्हीव्हीएन) यांचाही सहभाग होता. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, मॅप्रोचे व्यवस्थापकीय संचालक मयूर व्होरा, फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद शाळिग्राम, क्विकहीलचे संचालक डॉ. कैलाश काटकर, इंद्रनील चितळे, अतुल अष्टेकर, सचिन मालपाणी, डॉ. संजय चोरडीया आदी उपस्थित होते. फूड सीड टेक व्हीसी फंडचे सह-संस्थापक रोहित शाह, दिशा नाथवानी, व्हिक्टरी व्हर्स व्हीसी फंडचे सह-संस्थापक शुभम धूत, उत्सव जसपारा यांनी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमात एफएसटीद्वारे स्टार्टअपसाठी निधीसह आधुनिक व्यावसायिक धोरणांचे प्रदर्शन करण्यात आले. तर व्हीव्हीएनच्या नवीन निधीच्या धोरणाची घोषणा करण्यात आली. दिशा नाथवानी यांनी सूत्रसंचालन केले.

व्यावसायिक गप्पांचे प्रदर्शन...
कार्यक्रमाला सर्जनशीलतेसह जोडण्यासाठी रूपाली पाटील, कुशल व्होरा, अपर्णा शहा आणि अबीर पटवर्धन यांसारख्या नामवंत कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कलाकृती सादर केल्या. उद्योजकतेला पूरक आणि नावीन्यपूर्ण वातावरण असलेल्या पुण्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि विविध क्षेत्रात नवनिर्मिती करण्याची क्षमता या माध्यमातून मांडण्यात आली.

पुण्यातील उद्योजकांचे व्हीजन...
पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात काय बदल झाले. तसेच भविष्यात या क्षेत्राची परिस्थिती कशी असू शकते, याचा आढावा घेणारे ‘पुणे : द सायलेंट लायन’ हे पुस्तक तयार करण्यात येत आहे. त्याच्या कव्हर पेजचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते अनावरण झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

CSK vs RR : थाला चेन्नईमध्ये शेवटचा IPL सामना खेळणार? गतविजेत्या CSK चा लौकिक पणास; राजस्थानसमोर लागणार कस

Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

Nasa Solar Flares : सूर्यावरील मोठ्या स्फोटांमुळे पृथ्वीवर आलं सौरवादळ; नासाने शेअर केले फोटो..

Mothers Day 2024 : तब्बल एक हजारांहून अधिक मातांकडून 'दूध दान'; काय खासियत आहे मिल्क बॅंकेची?

SCROLL FOR NEXT