पुणे

गुंतवणुकीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. २८ : डिजिटल गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीला १५ लाखांना गंडा घातला. याबाबत चतु:शृंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुतारवाडी पाषाण भागातील एका ४७ वर्षीय व्यक्तीने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी तक्रारदारास डिजिटल गुंतवणूक करून नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी एक व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला. त्यानंतर तक्रारदाराच्या मोबाईलवर लिंक पाठवली. त्यानुसार तक्रारदार व्यक्तीने जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये १५ लाख ३४ हजार रुपयांची गुंतवणूक केली. परंतु चोरट्यांनी तक्रारदारास मुद्दल आणि नफ्याची रक्कम परत दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या वापरकर्त्यांवर आणि व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या ॲडमिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT