पुणे

लोकशाहीचे स्वास्थ्य युवकांच्या हातात

CD

पुणे, ता. १०ः देशातील लोकशाहीसमोर आज अनेक आव्हाने असली, तरी ती धोक्यात आलेली नाही. निरोगी लोकशाहीत मतदारांनी लोकप्रतिनिधींची कामे जाणून घेणे गरजेचे आहे. त्या आधारे योग्य क्षमतेच्या व्यक्तीची निवड करायला हवी. आजची पिढी अनेक बाबतीत माहितीसंपन्न असून, त्यांच्याच हाती लोकशाहीचे स्वास्थ्य आहे, असा सूर ‘भारतातील निवडणुकांचे भविष्य’ या चर्चासत्रात गुरुवारी उमटला.
फ्लेम विद्यापीठात आयोजित या चर्चासत्राला गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे, इंडियन एक्स्प्रेसचे डेप्युटी एडिटर अमिताभ सिन्हा, पीआरएस लेजिस्लेटीव्ह रिसर्चचे सहसंस्थापक डॉ. एम. आर. माधवन, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस आणि प्रा. डॉ. युगांक गोयल उपस्थित होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सत्तेचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे असल्याचे मत डॉ. रानडे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘पंचायत राज कायद्यानंतरही देशात सत्तेचे विकेंद्रीकरण झाले नाही. लोकशाहीत महत्त्वाचा घटक हा राजकीय पक्ष असून, त्यांचे नियमन आजही झालेले नाही. निवडणुकांवरील अधिकृत खर्च फार कमी आहे. त्यामुळे ‘एक देश एक निवडणूक’ या घोषणेला काहीही अर्थ नाही.’’
‘‘लोकांनी आपले मतदान बदलले तर राजकीय पक्ष उमेदवारही बदलतील,’’ असे स्पष्ट मत डॉ. माधवन यांनी व्यक्त केले.
केवळ सरकारमुळे नाही तर राजकीय पक्षांची बदलती मानसिकता, ट्रोलिंग आर्मी आणि समाजातील विविध प्रवाहामुळे आजचे माध्यम स्वातंत्र्य कमी झाले असल्याचे मत फडणीस यांनी व्यक्त केले. तर उमेदवारापेक्षा त्याचा पक्ष आणि पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सिन्हा म्हणाले, ‘‘आजच्या सरकारने केलेल्या अनेक गोष्टी आजवरच्या सरकारांनी कधी ना कधी केल्या आहेत. त्यामुळे लोकशाही धोक्यात आल्याचे म्हणणे चुकीचे आहे.’’ तथ्यांवर आधारित माहितीच्या आधारे लोकशाहीचे सक्षमीकरण करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT