पुणे

औंध, खडकीत सामाजिक, धार्मिक विषयांवर देखावे

CD

पुणे, ता. १५ : १२ ज्योर्तिलिंग दर्शन, नृसिंह अवतार, सरस्वती महल अशा धर्मिक देखाव्यांसह महिलांवरील अत्याचाराविरोधातील ‘स्त्री शक्तीचा जागर’, ‘मनोगत पुण्याचे अर्थात विद्येच्या माहेर घराचे’ अशा खडकी, औंध परिसरातील एकाहून अधिक सरस देखाव्यांनी भाविकांचे लक्ष वेधले आहेत.
खडकीतील मधला बाजार मित्रमंडळ ट्रस्टने आणि शिवप्रताप तरुण मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली आहे. नवी तालीम नूतन तरुण मंडळाने यंदा ‘१२ ज्योर्तिलिंग दर्शन’ हा देखावा सादर केला आहे. धोबी गल्ली मित्रमंडळाने यंदा आकर्षक महल साकारला आहे. डेपो लाइन मित्रमंडळाचा ‘नृसिंह अवतार’ हा देखावा वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. श्रीदत्त तरुण मंडळ ट्रस्टने यंदा ‘सरस्वती महल’ बनविला आहे. गवळीवाडा तरुण मंडळाने ‘आरक्षण दिले पण संरक्षणाचं काय’ या विषयावर जिवंत देखावा सादर केला आहे.
खडकीतील द नॅशनल यंग क्लबने ‘स्त्री शक्तीचा जागर’ हा जिवंत देखावा साकारला आहे. विकास तरुण मंडळाने ‘मनोगत पुण्याचे अर्थात विद्येच्या माहेरघराचे’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. औंध येथील कै. पिट्या ऊर्फ किरण सूर्यवंशी प्रतिष्ठानने यंदा एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांतील महलांचे ग्राफिकद्वारे सादरीकरण केले आहे.

आवर्जून पाहावेत असे देखावे
- नवी तालीम नूतन तरुण मंडळाने सादर केलेले ‘१२ ज्योतिर्लिंग दर्शन’
- द नॅशनल यंग क्लब महिलांवरील अत्याचाराविरोधातील ‘स्त्री शक्तीचा जागर’ हा जिवंत देखावा
- विकास तरुण मंडळाने फलकांद्वारे साकारलेला ‘मनोगत पुण्याचे अर्थात विद्येच्या माहेरघराचे’ हा जिवंत देखावा
- डेपोलाइन मित्र मंडळाने सादर केलेला ‘नृसिंह अवतार’ हा देखावा
- कै. पिट्या ऊर्फ किरण सूर्यवंशी प्रतिष्ठानने एलईडी स्क्रीनद्वारे सादर केलेले राज्यातील महलांचे ग्राफिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT