पुणे

संशयितांच्या हालचालींवर वॉच

CD

पुणे, ता. १५ : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी शहर पोलिसदल सज्ज झाले आहे. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी सात हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. संशयितांच्या हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
शहरात मंगळवारी (ता. १७) सकाळी विसर्जन मिरवणुकीस सुरूवात होईल. ही मिरवणूक दुसऱ्यादिवशी बुधवारी (ता. १८) दुपारपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गुन्हे शाखेसह बॉम्ब शोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि राज्य राखीव पोलिस दलाची पथके नेमली आहेत.
महिलांची छेडछाड, सोनसाखळी आणि मोबाईल चोरी रोखण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके असतील. सर्व लॉजेस आणि हॉटेलची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच, विसर्जन मिरवणुकीदरम्यान मद्यविक्रीची दुकाने १७ आणि १८ सप्टेंबरला मिरवणूक संपेपर्यंत बंद राहतील.

मध्य भागात वाहनांना प्रवेशबंदी
शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते आणि अंतर्गत रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना तातडीने घटनास्थळी पोचण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मध्यवर्ती भाग सोडून वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध राहील.

‘माय सेफ पुणे’ अॅप
‘माय सेफ पुणे’ अॅपद्वारे बंदोबस्त आणि मंडळांची माहिती प्राप्त होणार आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी जागा, पोलिस मदत केंद्र, पादचारी मार्ग, विसर्जन मिरवणूक मार्ग, बंद रस्ते आणि मंडळांच्या मिरवणुकीबाबत सद्य:स्थितीची माहिती दिली जाणार आहे.

प्रतिबंधात्मक आदेश...
- ध्वनीवर्धकास मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
- साउंड सिस्टीम लावताना आवाजाच्या डेसिबलबाबत नियमांचे पालन अनिवार्य
- मिरवणुकीत ज्वालाग्राही पदार्थास बंदी
- सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, रुग्णालय परिसरात फटाक्यांवर बंदी
- आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT