UGC NET 2024 sakal
पुणे

UGC NET 2024 : ‘सीएसआयआर’ नेटचे विद्यार्थी हवालदिल

विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘सीएसआयआर’ नेटचे विद्यार्थी देखील हवालदिल झाले असून आमची परीक्षा तरी पारदर्शकपणे पार पडणार का? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) पेपर फुटीमुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘सीएसआयआर’ नेटचे विद्यार्थी देखील हवालदिल झाले असून आमची परीक्षा तरी पारदर्शकपणे पार पडणार का? असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहे. त्यामुळे नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) यासंबंधी स्पष्टता गरजेची आहे.
मंगळवारी (ता. १८) देशातील ३१७ शहरात ११ लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी यूजीसी नेटची परीक्षा पार पडली होती. त्यात पेपर फुटीचा प्रकार घडल्याची माहिती इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने शिक्षण मंत्रालयाला दिली होती.

त्याआधारे २४ तासांच्या आत यूजीसी पुनर्परीक्षेची घोषणा करत सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले. आता पुढील आठवड्यातच जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विद्याशाखेतील विद्यार्थ्यांची ‘सीएसआयआर’ नेटची परीक्षा पार पडत आहे. यूजीसी प्रमाणेच ‘सीएसआयआर’ची नेट परीक्षाही राष्ट्रीय चाचणी संस्थेकडे (एनटीए) आहे. त्यामुळे यूजीसी प्रमाणे ‘सीएसआयआर’च्या नेट परीक्षेत गडबड होईल का? अशी भीती सध्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. देशभरात अडीच लाखाहून अधिक विद्यार्थी ‘सीएसआयआर’ नेट परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

विद्यार्थ्यांना भूर्दंड...
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी ‘नेट’ परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून पाठ्यवृत्ती मिळण्याबरोबरच सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी नेट परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थी दोन ते तीन वर्षांपर्यंतही नेटचा अभ्यास करत असतात. दुसरीकडे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी येऊन राहण्याची व्यवस्था करावी लागते. पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक भूर्दंड सहन करावा लागतो. ‘एनटीए’च्या कारभाराबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आता प्रचंड उद्विग्नता आहे.

नेमका फरक काय?
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) वतीने घेण्यात येणाऱ्या नेट परीक्षेत भाषा, वाणिज्य, व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान आणि शिक्षण याविषयांचा समावेश असतो. तर वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) नेट परीक्षेत प्रामुख्याने विज्ञान शाखेतील विषयांचा समावेश असतो.

सीएसआयआर नेट उत्तीर्ण होणारे बहुतांश विद्यार्थी देशातील सर्वोत्तम प्रयोगशाळांत संशोधनासाठी पात्र ठरतात. मात्र, नेट परीक्षेचे व्यवस्थापन ‘एनटीए’कडे गेल्यापासून गैरव्यवस्थापन वाढले आहे. त्यातच यूजीसी नेट रद्द झाल्यानंतर ‘सीएसआयआर’च्या परीक्षेबद्दलही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आमच्या पातळीवर विद्यार्थ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून, या विषयी ‘एनटीए’कडून अधिकृत निवेदन गरजेचे आहे.
- ज्ञानदेव पाडेकर, संचालक, डीफिजीक्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna : मोठी बातमी ! प्रज्वल रेवण्णाला जन्मठेप; लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

भाड्याच्या घरात सापडलेला रवींद्र महाजनी यांचा मृतदेह; पत्नी- मुलासोबत का राहत नव्हते? हे होतं कारण

Georai News : मुंबईतील सीआयएसएफ मुख्यालयात जवानाने संपविले जीवन; धक्कादायक घटनेने गेवराईच्या तलवाड्यात शोककळा!

Astrological Prediction : उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील नेत्याची निवड ते राज्य मंत्रिमंडळातील बदल; काय सांगत राजकीय भविष्य? वाचा...

Education News : शिक्षक नाहीत तर शाळा कशाला?"; आदिवासी पालकांचा संतप्त सवाल

SCROLL FOR NEXT