पुणे

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर शिवसेनेत

CD

पुणे, ता. १० ः कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी (ता. १०) काँग्रेसला रामराम ठोकत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
काही दिवसांपूर्वी त्यांनी भगवे उपरणे परिधान केल्याचा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवला होता. त्यानंतर धंगेकर काँग्रेस सोडणार अशा चर्चांना उधाण आले होते. पण त्या वेळी त्यांनी मी असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर आज त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. धंगेकर यांच्यासह कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे सुरेश जैन, बाळासाहेब भांबरे, प्रणव धंगेकर, साकी बाबाजी, गोपाळ आगरकर, मिलिंद आहेर आदींनी प्रवेश केला. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, शहरप्रमुख नाना भानगिरे, संपर्कप्रमुख अजय भोसले, किरण साळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील महिला, शेतकरी, युवकांना न्याय दिला. याच पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही शिवसेनेत आलो आहोत. शिंदे जो आदेश देतील, त्यानुसार मी काम करायला तयार आहे. शिवसेनेच्या नावाला कमीपणा येऊ देणार नाही. काँग्रेस सोडणे माझ्यासाठी सोपा निर्णय नव्हता; पण कार्यकर्त्यांशी, मतदारांशी चर्चा करून मी हा निर्णय घेतला आहे.
- रवींद्र धंगेकर, माजी आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT