पुणे

पुणे शहर परिसरात पावसाचा जोर घटला

CD

पुणे, ता. २२ : गेल्‍या चार ते पाच दिवसांपासून पुण्‍यात सुरू असलेला पावसाचा जोर शुक्रवारी घटला. शुक्रवारी अधूनमधून पुणे व परिसरात रिमझिम पाऊस पडत होता. त्‍या पावसाने पुणेकर चिंब झाले. दिवसभरात शहरात शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव या भागांमध्ये पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा इशारा दिलेला नसून, वातावरण ढगाळ राहण्याचा व हलक्‍या स्‍वरूपाचा पाऊस पडण्‍याची शक्‍यता हवामानशास्‍त्र विभागाने व्‍यक्‍त केली आहे.

गेल्‍या चार ते पाच दिवसांपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. घाटमाथ्‍यावर ‘रेड अलर्ट’ दिल्‍याने व तेथे पाऊस जोरदार बरसल्‍याने खडकवासला धरणातून मुठा नदीत ३५ हजार क्‍यु‍सेक वेगाने पाणी सोडले होते. शहरातही पावसाने दमदार हजेरी लावली होती, मात्र त्‍याचा जोर शुक्रवारी घटला. सकाळपासून शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते, तसेच काही वेळ ऊनही पडल्‍याचे पाहायला मिळाले, तर सायंकाळी चारच्‍या सुमारास शहरात पाऊस झाला, पण त्‍याचा जोर कमी होता.

दरम्‍यान, आठवडाभर कमाल तापमान २७ ते २८, तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्‍यता व्‍यक्‍त केली आहे.

सोमवार व मंगळवार घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्‍याची शक्‍यता असून, दोन दिवस येथे ‘येलो अलर्ट’ दिला आहे, तर बुधवार व गुरुवार दोन्‍ही दिवस पुन्‍हा ढगाळ वातावरण राहणार असल्‍याची शक्‍यता हवामान विभागाने व्‍यक्‍त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT