पुणे

राज्याने व्यापक नागरी विमान वाहतूक धोरण तयार करावे

CD

पुणे, ता. १९ : भारताच्या नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची अभूतपूर्व अशी वाढ होत आहे. यातून महाराष्ट्राला हवाई क्षेत्रात खूप मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी व राज्यातील हवाई क्षेत्रातील विकास साधण्यासाठी राज्याचे स्वतंत्र नागरी विमान वाहतूक धोरण असणे आवश्यक आहे, तशी मागणी हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून, मुख्यमंत्री कार्यालयाने त्याची दखल घेतली असल्याचे वंडेकर यांनी सांगितले.
‘देशाच्या व्हिजन २०४०’शी सुसंगत भविष्यकालीन व व्यापक हवाई धोरण ठरवून त्यात नागरी हवाई वाहतूक क्षेत्रासाठी एक योग्य रोडमॅप तयार करणे आवश्यक आहे. यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. महाराष्ट्राच्या नागरी हवाई वाहतूक विभागासाठी एक समर्पित वेबसाइट असणे आवश्यक आहे. यात राज्यातील सर्व विमानतळ, लँडिंग ग्राउंड, वॉटर ड्रॉम्स, हेलिपोर्ट, एमआरओ, एफटीओ यांचा समावेश असावा. नाशिक, छत्रपती संभाजीनगर व शिर्डी विमानतळ येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणे आवश्यक आहे. येथे आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होण्यासाठी आवश्यक त्या पायभूत सुविधा उपलब्ध आहेत. तेव्हा आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची मागणी वंडेकर यांनी केली आहे. तसेच सोलापूर, अकोला व रत्नागिरी येथून ‘उडान’अंतर्गत विमानसेवा सुरू होणेही आवश्यक आहे. तसे झाल्यास या भागातील पर्यटन, व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी मोठी चालना मिळेल, असेही त्यांनी प्रस्तावात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कृषी खातं म्हणजे त्रास? क्रीडा खात्याचं बरं होतं, लय त्रास नव्हता, मंत्री भरणेंचं विधान; स्पष्टीकरणही दिलं

Asim Munir : 'अल्लाहनं मला रक्षक म्हणून पाठवलंय...'; ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभूत झाल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख?

Success Story: ऊसतोड कामगाराची लेक ठरली मुंबई पोलिसांत; गावकऱ्यांचा अभिमान वाढला

Bihar Elections 2025 : बिहारमध्ये गुंतवणूकदारांसाठी पायघड्या; नीतिशकुमार यांची आर्थिक विशेष पॅकेजची घोषणा

Kishtwar Disaster : बचाव कार्य सुरू, ७५ जण बेपत्ताच; अब्दुल्ला यांची चशोटला भेट, मृतांची संख्या ६० वर

SCROLL FOR NEXT