Asim Munir Statement : ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभूत झाल्यानंतर पाकिस्ताननं असीम मुनीर यांना चीफ मार्शलपदी नियुक्त केलं होतं. त्या काळातच अमेरिकेतील एका कार्यक्रमादरम्यान मुनीर यांनी म्हटलं होतं की, 'या संघर्षात कोण जिंकले? आम्हाला चीफ मार्शल बनवण्यात आलं, यावरूनच उत्तर मिळेल, समजून घ्या.' त्यानंतर त्यांची ती विधानं चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी स्वतःबद्दल धक्कादायक विधान केलं असून ते म्हणाले की, 'अल्लाहनं मला रक्षक म्हणून पाठवलं आहे.'