पुणे, ता. २९ : राज्यभरातील टेनिस बॉल क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्याची आणि तब्बल एक कोटींहून अधिक रुपयांची बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी आता उपलब्ध होणार आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे जगातील सर्वात मोठ्या टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेच्या नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
व्यावसायिक क्रिकेटप्रमाणेच टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट हे देशात लोकप्रिय असून, शहरांमध्ये विविध ठिकाणी नियमितपणे बॉक्स क्रिकेट खेळले जाते. येथे गुणवान खेळाडूंची जणू खाणच आहे. अशाच खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सकाळ’ने या भव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, गोवा या शहरांमध्ये ही स्पर्धा होणार असून, १२ वर्षे वयापुढील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
फ्रँचायझी पद्धतीने होणारी ही स्पर्धा असून, फ्रँचायझी व खेळाडूंसह किंवा केवळ फ्रँचायझी खरेदी करून अथवा केवळ खेळाडू म्हणूनही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला तब्बल एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच, अन्य सांघिक आणि वैयक्तिक क्रमांकानाही रोख रकमेची बक्षीसे दिली जाणार आहेत.
भारतात ‘क्रिकेट’ या खेळाची लोकप्रियता मोठी आणि क्रिकेटच्या चाहत्यांसह क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचीही संख्या तितकीच मोठी. त्यामुळेच व्यावसायिक क्रिकेटइतकेच टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट, हे देखील आता स्वतंत्र क्रीडाप्रकार म्हणून पाहिले जाते. ‘सकाळ’तर्फे आयोजित टेनिस बॉल बॉक्स क्रिकेट स्पर्धेतून या प्रकारातील गुणवान क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठावर संधी मिळणार आहे.
----
असे व्हा सहभागी :
- थेट प्रवेश (फ्रँचायझी + खेळाडूंसह)
- संपूर्ण मालकी (केवळ फ्रँचायझी मालक म्हणून)
- वैयक्तिक खेळाडू म्हणून
स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी www.crorepaticricket.com या संकेतस्थळाला भेट द्या किंवा बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.
----
फ्रँचायझी विकत घेण्यासाठी संपर्क (सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत)
(प्रत्येक आवृत्तीने आपापला क्रमांक वापरावा) :
१) पुणे - ७२७६७ ४८०७८
२) अहिल्यानगर - ९८८१० ९८०७८
३) सातारा- ९९२२९ १३३४५
४) सोलापूर- ९८५०८ ९४३५५
५) छत्रपती संभाजीनगर, नांदेड- ९८२२६ ३०५५५
६) गोमंतक- ८५५४० ५५९५२
७) कोल्हापूर, सांगली- ७०५७० १९९०१
८) मुंबई- ८०८०२ १४२४२
९) नागपूर, अकोला- ९८२२१ २९६८६
१०) नाशिक, जळगाव- ८३८०० ३३७४२
स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क (सर्व आवृत्त्यांनी वापरायचा क्रमांक) : ९०२२९ ८१०४८
फोटो ः 37830, 37831
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.