पुणे

कायदा काय सांगतो ? ॲड. जान्हवी भोसले

CD

कायदा काय सांगतो ? ॲड. जान्हवी भोसले
----
प्रश्न : वाटपाच्या दाव्याचा न्याय निर्णय झाला, तरीदेखील अद्याप प्रत्यक्ष वाटप झाले नाही तर त्यासाठी काय करावे?
उत्तर : वडिलोपार्जित मिळकतीमध्ये दावा दाखल झाल्यानंतर न्यायालय योग्य तो न्याय निवाडा करून निर्णय देते, परंतु वाटपाच्या दाव्याच्या निर्णयाप्रमाणे वाटप मिळण्यासाठी न्यायालयात आपणास ‘दरखास्त दावा’ दाखल करावा लागतो. या दाव्यामध्ये न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी न्यायालयाकडे विनंती केलेली असते. त्याप्रमाणे न्यायालयाकडून जिल्हाधिकारी आणि त्यांच्याकडून तहसीलदार यांच्याकडे भूमी अभिलेख पाठवले जातात. त्याप्रमाणे वाटप करून दिले जाते.
--------
प्रश्न : आमची न्यायालयामध्ये केस चालू आहे. आम्ही वकीलदेखील दिलेले आहेत, परंतु आमचे वकील तारखेला हजर राहत नाहीत व त्यामुळे विरोधी पक्षाचे वकील फायदा घेतात. आमच्यावर नको-नको ते आरोप करतात व न्यायाधीश सतत आम्हाला सांगत असतात ‘तुमच्या वकिलांना फोन करून बोलावून घ्या.’ आम्ही वकील बदलू शकतो का?

उत्तर : नक्कीच तुम्ही वकील बदलू शकता. तुमचे वकील का येत नाहीत, या कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. पक्षकार चालू केसमध्ये कितीही वेळा आपले वकील बदलू शकतात, परंतु आधीच्या वकिलाकडून त्यांचे हरकत नसल्याची सही आणणे गरजेचे असते. तुम्ही वकील बदलल्याने तुमच्या केसवर विपरीत परिणाम होईल, असा विचार करू नका. योग्य तो वकील घेणे तसेच तुम्हाला हवे असल्यास वकील बदलणे हा पक्षकारांचा अधिकार आहे. वकिलांची नियुक्ती करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पैसे नसल्यास तुम्ही न्यायालयाकडे विनंती करून मोफत वकील नियुक्त करून घेऊ शकता.
-----------
प्रश्न : पती जिवंत असताना पोटगी दिली असेल, तर पतीच्या निधनानंतर पत्नीला पतीच्या मिळकतींमध्ये हक्क सांगता येतो का?
उत्तर : पती-पत्नीमध्ये वाद झाले असतील, पती-पत्नी वेगळे राहत असतील, पत्नीने न्यायालयामध्ये पोटगीसाठी अर्ज केला असल्यास या अर्जान्वये कोर्टाने पत्नीला पोटगीचा हुकूम दिला असेल, त्याप्रमाणे पतीने पत्नीला पोटगीची रक्कमही दिली असेल आणि पतीचे निधन झाल्यास, पतीच्या मृत्यूनंतर पतीच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये वारसा कायदा हक्काने पत्नीस हिस्सा मिळतो, तसेच पतीच्या स्वकष्टार्जित मिळकतीमध्येदेखील पत्नीला हिस्सा मिळतो. पोटगीच्या आदेशामुळे पत्नीचा वारसा हक्क संपुष्टात येत नाही.
---------
प्रश्न : आम्हाला न्यायालयातून घटस्फोट घ्यायचा आहे, तर त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, तसेच किती वेळ लागू शकतो?
उत्तर : न्यायालयामध्ये घटस्फोटाचा अर्ज करण्यासाठी तुम्ही अगोदर एक वर्ष वेगळे राहिलेले असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची लग्नपत्रिका, लग्नाचा फोटो, विवाह नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची गरज लागते. घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यानंतर अंदाजे सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये घटस्फोट मिळू शकतो; परंतु काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये न्यायालय सहा महिन्यांचा वेळ कमी करू शकते.
------------
प्रश्न : आमच्या ग्राहकाने मला दोन धनादेश दिले आहेत, हे धनादेश मी माझ्या खात्यामध्ये टाकले असता ‘स्टॉप पेमेंट’च्या कारणाने परत आले, आमच्या व्यवहारासंदर्भात सर्व चलन माझ्याकडे आहेत, तर मी काय करू शकतो?
उत्तर : धनादेश ‘स्टॉप पेमेंट’ या कारणाने परत आल्यानंतर पुढील ३० दिवसांमध्ये त्यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस देणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८ च्या अंतर्गत आपण त्यांच्याविरुद्ध चेक बाउन्सची केस दाखल करू शकता. या केसच्या निकालात समोरील व्यक्तीला कमीतकमी सहा महिने ते दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच तुम्ही त्यांच्याविरुद्ध नुकसानभरपाईचा दावादेखील करू शकता.
----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT