सामाजिक उपक्रमाबरोबरच
शिक्षणालाही प्राधान्य
होनाजी तरुण मंडळ- ( वर्ष १२५ )
बुधवार पेठ, गवळी आळी,
मंडळाची स्वातंत्र्यपूर्व काळातील साधारण १९०१ ते १९०२ यावेळी स्थापना झाली. त्या काळात इंग्रजी राजवटीविरुद्ध स्वतंत्र लढा चालू असताना लोकमान्य टिळक व भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशोत्सवामुळे समाज एकत्रित झाला, त्यांचीच प्रेरणा घेऊन काही समाजबांधवांनी या मंडळाची स्थापना केली. ही गणेशमूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली असून, मूर्तीच्या ३ हातात शस्त्र आहे. त्यातील एक हाताने इंग्रजीरूपी राक्षसाचा कान पकडला असून, राक्षस वध स्वरूपातील मूर्ती आहे. २००१ मध्ये मंडळाची शताब्दी झाली. मंडळाच्या ब्रीदवाक्य हे ‘एकी हेच बळ’ हे आहे. तसेच मंडळ हे गणेशोत्सव सोडून पूर्ण वर्षभर विविध सण विशेष मुलांसोबत साजरा केला जातो. तसेच विविध शिबिरे देखील घेतली जातात. दर वर्षी पर्यावरणपूरक देखावे आणि सामाजिक संदेश देणारे सजावट केली जाते.
सामाजिक कार्य -
- गतिमंद मुलांच्या शाळेत धान्यवाटप,
- रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरे
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या मुलामुलींच्या सर्व लग्नाचा खर्च करणे
- गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन मदत तसेच त्यांची शैक्षणिक शुल्क भरून त्यांना शिक्षण देणे
- वृक्षारोपणाचे आणि जनजागृतीचे कार्य
- मणिपूरला झालेल्या पूरप्रसंगी त्यांना आपत्कालीन साहित्य आणि ब्लँकेट्स पाठवण्यात आले.
- स्वच्छता मोहीम
-----
कार्यकर्ते -
- अध्यक्ष - राहुल आलमखाने, उपाध्यक्ष शैल्यनाथ भोकरे, रवींद्र मुळे, अजय शिलारखाने, भाऊसाहेब भोकरे, मोहन दुसाने, संजय साळुंखे, अमर मारटकर, गणेश सोनवणे, जितेंद्र मुंगळे, संजय भोकरे
------------------
फोटोः 40801
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.