पुणे, ता. १८ : हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनंतर पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातून विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने विशेष पथके नेमली आहेत.
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी दोन पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. झाडांच्या फांद्या पडणे, रस्त्यांवर पाणी साचणे अशा तक्रारी सोमवारी दिवसभर आल्या; मात्र त्या तातडीने सोडवल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी गणेश सोनुने यांनी सांगितले.
अशी आहे तयारी
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन पथके सज्ज
- मलनिःसारण भागाच्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी
- विसर्जन झाल्यास जलसंपदा विभाग व पोलिस खात्याशी समन्वय
पावसाचा प्रत्यक्ष परिणाम
सकाळपासून झालेल्या सततच्या पावसामुळे बाणेर, शंकरशेठ रस्ता, येरवडा येथील गुंजन टॉकीज परिसर अशा ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तुंबलेले पाणी काढून वाहतूक सुरळीत केली.
नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
‘‘हवामान विभागाने दिलेला अलर्ट लक्षात घेऊन महापालिकेकडून सर्व तयारी पूर्ण केली आहे. मात्र घाटमाथ्यावर पाऊस वाढून धरणातून विसर्ग सुरू झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहावे,’’ असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सोनुने यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.