पुणे

डॉ. फाळके, डॉ. हिरेमठ यांना ‌मृत्युंजय प्रतिष्ठानचे पुरस्कार

CD

पुणे, ता. १२ ः ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांच्या स्मरणार्थ कार्यरत असलेल्या येथील मृत्युंजय प्रतिष्ठानमार्फत देण्यात येणारा साहित्यविषयक पुरस्कार यंदा डॉ. केदार फाळके यांना; तर समाजकार्यविषयक पुरस्कार डॉ. राजेंद्र हिरेमठ यांना जाहीर झाला आहे.
प्रतिष्ठानचे संस्थापक व कार्यकारी विश्वस्त डॉ. सागर देशपांडे यांनी ही माहिती दिली. पुरस्कारांचे हे १९ वे वर्ष असून, शिवाजी सावंत यांच्या २३ व्या स्मृतिदिनी म्हणजेच गुरुवारी (ता. १८) हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात संध्याकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’चे (एनआयए) माजी पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
डॉ. फाळके हे इतिहासाचे; प्रामुख्याने शिवचरित्राचे संशोधक, लेखक आणि वक्ते आहेत. आजवर त्यांचे इतिहासविषयक १४ ग्रंथ मराठी व इंग्रजी भाषेतून प्रकाशित झाले असून, सहा संशोधनपर निबंध प्रकाशित झाले आहेत. डॉ. हिरेमठ हे दिव्यांग असून, प्रतिकूलतेवर मात करत त्यांनी ‘पीएच.डी’पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. उद्योजकता विकास, ग्रामविकास, बँकिंग या क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले असून, ते सध्या पुण्यातील वानवडीच्या दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे उपाध्यक्ष तर जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात.

कोल्हापूर येथे स्मृतिदालन
मृत्युंजय प्रतिष्ठान, निर्धार-कोल्हापूर आणि समीर देशपांडे यांनी पुढाकार घेऊन शिवाजी सावंत यांच्या जन्मगावी आजरा येथे कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत एक भव्य सभागृह आणि स्मृतिदालन उभारले आहे. याला ‌‘मृत्युंजय’कारांचेच नाव देण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. सागर देशपांडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

Chhatrapati Sambhajnagar: दिवसभर उकाडा; सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी; विजांच्या कडकडाटासह शहरभर पावसाचे आगमन

Shaktipith Highway Kolhapur : शक्तिपीठ महामार्गाचा नकाशा बदलला, कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, शिरोळ, हातकणंगले वगळले

Pune Rain News: पुण्याला गारांच्या पावसाचा तडाखा; मध्यवर्ती भागासह उपनगरांत नागरिकांची तारांबळ, झाडपडीच्‍या आठ घटना!

Chhatrapati Sambhajinagar: त्याने भरले बेरंगी आयुष्यात रंग!; ऑटिझमवर मात करीत स्वराज राजपूत बनला आईचा आधार

SCROLL FOR NEXT