पुणे

सकाळ संवाद

CD

सार्वजनिक वाचनालयाची भिंत कोसळली
धायरी येथील लगडमळा भागातील राजयोग सोसायटीच्या लेनमध्ये असलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयाची संरक्षक भिंत शेजारच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबीचा धक्का लागून कोसळली. या परिसरातील चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमारे ५० सदस्य दररोज सकाळी या वाचनालयात एकत्र येत असतात. संरक्षक भिंत कोसळल्यामुळे तिथे येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी ठेवलेले काही लोखंडी बाकही गायब झाले आहेत. या दुरवस्थेकडे प्रशासनाने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय तातडीने दूर करणे आवश्‍यक आहे.
- सुनील देशपांडे, धायरी
---------------------------------------------
दांडेकर पूल परिसरात अतिक्रमणे
दांडेकर पुलाच्या दोन्ही बाजूला अनेक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे मुख्य पूल व आजूबाजूचे रस्ते अरुंद झाल्यामुळे वाहतुकीला असंख्य अडथळे निर्माण झाले आहेत. वाढदिवसानिमित्त व जयंतीनिमित्त विनापरवाना फलकबाजी केली जात आहे. स्पीकरच्या आवाजामुळे आजूबाजूच्या घरांच्या काचा थरथरतात. येथे रस्त्याच्या मधोमध मांडव टाकून उत्सव साजरे केले जात असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क केल्यानंतरही या सर्व प्रकारांकडे दुर्लक्ष केले जाते. वाहतूक पोलिस अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळात वेळ काढून या परिसरातील वस्तुस्थितीची पाहणी करावी व येथील समस्यांवर योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- डॉ. श्रीपाद शिंगवेकरस, नवी पेठ
----------------------------------------
कोपा मॅाल रस्त्यावरील पथदिवे बंद
कल्याणीनगरपासून मगरपट्ट्याकडे जाणाऱ्या कोपा मॅाल रस्त्यावरील पथदिवे कायम बंद अवस्थेत असतात. येथे वाहतूक कोंडीची समस्यादेखील वाढत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या ठिकाणी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
- एक नागरिक
--------------------------------------------
लेकटाउन रस्ता पुर्ववत करावा
महापालिकेने बिबवेवाडीतील चैत्रबन येथील लेकटाउन रस्ता काही कामानिमित्त वर्षभरापूर्वी खोदला होता, मात्र हा रस्ता पुर्ववत न केल्याने येथील नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर सम-विषम पार्किंगची व्यवस्था केलेली आहे, परंतु खोदाईमुळे नागरिकांना या पार्किंगचा योग्य वापर करता येत नाही. यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.
- निरंजन पुरोहित, बिबवेवाडी, पुणे
---------------------------------------
दशभुजा गणपतीजवळील रस्त्यावर पाणी
कर्वे रस्त्यावरील दशभुजा गणपतीजवळील रस्त्यावर पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना न केल्याने रस्त्याच्या बाजूला पाणी साचले आहे. त्यातच येथील पदपथ अरुंद असल्याने पादचारी नागरिकांना चालण्यासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याने गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. येथील पदपथावर पत्र्याचे कुंपण आल्याने पदपथावरून एका वेळेस फक्त एकच माणूस चालू शकतो. त्यामुळे पादचारी मुख्य रस्त्यावरून ये-जा करत असल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- एक जागरूक नागरिक
-------------------------------------------
वारज्यातील कालवा रस्त्यावर कचरा
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून वारज्यातील कालवा रस्त्यावर बांधलेल्या पदपथावर स्थानिक नागरिकांकडून कचऱ्याच्या पिशव्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे हा पदपथ अस्वच्छ झाला आहे. तसेच या पदपथावर असंख्य व्यावसायिक वाहने रात्रीच्या वेळी उभी असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगातून चालावे की या वाहनांतून मार्ग काढावा, असा प्रश्‍न पडतो. महापालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने ठिकठिकाणी कचरा न टाकण्याचे आवाहन करणारे फलक येथे लावले आहेत, परंतु येथील काही स्थानिक त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने परिसराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने अशा बेशिस्त नागरिकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.
- डॉ. अविनाश बडदे, वारजे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत मुसळधार, विक्रोळीत दरड कोसळून बापलेकीचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी

Mumbai Local Train : मुंबईत मुसळधार! मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल रखडल्या; प्रवाशांची पायपीट, उशिराने धावताहेत गाड्या

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबईसह मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता; IMD चा अलर्ट

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष असते तर युक्रेन युद्ध झालंच नसतं, अलास्कात बोलले पुतीन; म्हणाले, शांततेचा तोडगा काढा पण...

Jasprit Bumrah ला टीम इंडियात घेण्यासाठी केलेली शिफारस? इशांत शर्माने सांगितली इनसाईड स्टोरी; म्हणाला,'दुखापत झाली अन्...'

SCROLL FOR NEXT