Mumbai Local Train Update : मुंबई आणि उपनगरात काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. शुक्रवारी सकाळपासून आकाशात काळे ढग दाटले असून ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी (IMD Orange Alert Mumbai) कोसळल्या. या पावसाचा फटका थेट मुंबईच्या 'लाइफलाइन' समजल्या जाणाऱ्या लोकल सेवेला बसला आहे.