
मुंबईत विक्रोळी परिसरात दरड कोसळून दुर्घटना घडलीय. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे झोपेतच दोघांचा मृत्यू झाला. मुंबईसह उपनगरात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढलाय. विक्रोळीत पार्कसाइट परिसरात यामुळे दरड कोसळून दुर्घटना घडलीय. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे जखमी असल्याची माहिती समोर आलीय.