पुणे

पुण्यात ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’ रंगणार ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम’मध्ये ६ डिसेंबरला मैफील

CD

पुणे, ता. ३१ ः प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान यांची गाणी म्हणजे संगीतप्रेमींसाठी पर्वणीच. त्यातही एखाद्या मैफिलीत भव्य वाद्यवृंदासह त्यांना प्रत्यक्ष गाणी सादर करताना पाहणे आणि ऐकणे, हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हा अनुभव घेण्याची संधी पुणेकरांना ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिली आहे.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम’ अंतर्गत ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. ६ डिसेंबरला सायंकाळी सातला कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे ही भव्य मैफील होणार आहे. विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आणि व्हीटीपी रिअल्टी हे या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत.
सुनिधी चौहान या भारतातील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहेत. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी ‘मेरी आवाज सुनो’ या दूरदर्शनवरील स्पर्धेत विजेतेपद पटकावत त्यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या गायकीचा ठसा उमटवला. ‘रमैय्या वस्तावैय्या’, ‘मस्त’, ‘फिजा’ या चित्रपटांपासून त्यांच्या प्रवासाला सुरवात झाली. ‘शीला की जवानी’, ‘कमली’, ‘देसी गर्ल’, ‘बीड़ी जलाईले’, ‘धूम मचाले’, ‘हे शोना’, ‘बिन तेरे’ अशा अनेक गाजलेल्या गाण्यांनी त्यांनी रसिकांना श्रवणानंद दिला.
कार्यक्रमाची तिकिटे districtbyzomato.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच, बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून देखील तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. रसिकांनी लवकरात लवकर तिकिटे आरक्षित करावीत, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.
----
मैफील गाजवणारी गायिका
सुनिधी चौहान यांची ध्वनिमुद्रित गाणी ऐकणे, हा आनंदाचा भाग असला तरी त्यांना प्रत्यक्ष मैफिलीत ऐकणे, हा निराळा आणि अविस्मरणीय अनुभव असतो. ऊर्जेने भारलेले त्यांचे सादरीकरण आणि संगीतासह नृत्याचा संगम, यामुळे त्यांची मैफील कानांसह डोळ्यांचेही पारणे फेडणारी असते. देश-विदेशात त्यांनी अशा शेकडो मैफीली सादर केल्या आहेत. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना भावणारी ही मैफील आता पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

फोटोः 64014, 64015, 64016

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘HSRP’ नंबरप्लेट नंबर नसल्यास होणार ‘इतका’ दंड! पहिल्यांदा १००० रुपये, त्यानंतर प्रत्येकवेळी १५०० रुपये दंड; सोलापूर जिल्ह्यात ७,२६,९१८ वाहनांना जुनीच नंबरप्लेट

Farmer Agitation : शेतकरी आंदोलनाचे केंद्र ठरला राष्ट्रीय महामार्ग; शेतकऱ्यांच्या ‘महाएल्गार’मुळे ३० तास बंद

Numerology News : मूलांकाप्रमाणे 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात 'महास्वार्थी'! पण प्रेमात निघतात सगळ्यात लकी..हे तुम्ही तर नाही ना?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 नोव्हेंबर 2025

‘टीईटी’च्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकार गप्पच! राज्यातील ३५ शिक्षक संघटनांनी उपसले आंदोलनाचे हत्यार, ९ नोव्हेंबरला राज्यभर मूक मोर्चाचे नियोजन

SCROLL FOR NEXT