पुणे

तरतुदींचे उल्लंघन केल्यास संस्थांवर दंडात्मक कारवाई

CD

पुणे, ता. १० : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी लागू केलेले शुल्क परतावा धोरण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये देखील कायमच राहणार आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास शिक्षण संस्थांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयोगाने दिला आहे.

विद्यार्थ्यांनी ३० सप्टेंबरपूर्वी प्रवेश रद्द केला असल्यास पूर्ण शुल्काचा परतावा देणे आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रवेश रद्द केला असल्यास एक हजार रुपयांपेक्षा कमी रक्कम प्रक्रिया शुल्क म्हणून आकारून उर्वरित शुल्क परत करणे आवश्यक असल्याचे आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी यांनी परिपत्रकात नमूद केले आहे.
आयोगाने जून २०२४ मध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शुल्क परतावा धोरण जाहीर केले होते. हेच धोरण शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी लागू केले आहे. नवीन शुल्क परतावा धोरण अस्तित्वात येईपर्यंत हेच धोरण पुढील शैक्षणिक सत्रांसाठीही कायम असेल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
सर्व उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी २०२१-२२ ते २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील शुल्क परताव्याच्या प्रलंबित प्रकरणांबाबत कार्यवाही करताना शुल्क परताव्याच्या अंतिम तारखेचे काटेकोर पालन करावे. उच्च शिक्षण संस्था यूजीसीच्या शुल्क परतावा धोरणातील तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast Update : दिल्ली स्फोटातील गाडी नेमकी कुणाची? महत्त्वाची अपडेट समोर...

Amit Shah on Delhi Red Fort Blast : दिल्ली लाल किल्ला स्फोटानंतर गृहमंत्री अमित शहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Delhi Red Fort blast Live Update : मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रूग्णालयात जाऊन घेतली जखमींची भेट; घटनास्थळाचीही पाहणी केली

Maharashtra Alert Delhi Blast : RSS कार्यालय ते मुंबईची IMP ठिकाणे; पुणे, कोल्हापुरात हाय अलर्ट, दिल्ली बॉम्ब हल्ल्यानंतर पोलिस प्रशासनाचा डोळ्यात तेल घालून तपास

Maharashtra Alert Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर महाराष्ट्रात जोरदार हालचाली, पुण्यात अलर्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’वर पोलिसांची घेतली बैठक

SCROLL FOR NEXT