पुणे

अर्धवट कामांसाठी निधी वळवला आयुक्तांचे स्पष्टीकरण

CD

पुणे, ता. १९ : पुणे महापालिकेतील माजी स्वीकृत सदस्याच्या मागणीनुसार तब्बल अडीच कोटी रुपयांच्या पाच निविदांना आयुक्तांनी मान्यता दिली होती. त्यावर आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ही कामे जुनीच असून, काम पूर्ण करण्यासाठी हा निधी दिला आहे, असे स्पष्टीकरण दिले आहे. तीन वर्षे नगरसेवक नसतानाही ही कामे अपूर्ण कशी राहिली, यावर आयुक्तांनी उत्तर दिलेले नाही.

पुणे महापालिकेत गेल्या काही महिन्यांपासून काही माजी नगरसेवक त्यांचा राजकीय दबाव वापरून प्रशासनाकडून कोट्यवधींचा निधी त्यांच्या प्रभागात वळवत आहेत. एकीकडे विविध कामे करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निधी मिळत नाही तर काही माजी नगरसेवक प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण निधीअभावी त्यांचीही कामे होत नसल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे काही माजी नगरसेवकांना विशेष वागणूक देऊन निधी दिला जात आहे.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवकांनी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी अशाच प्रकारे वर्गीकरण करून पळविला आहे. त्यासाठी काढल्या जाणाऱ्या निविदांमध्ये संगनमत होत असल्याने माननीयांच्या मर्जीतील ठेकेदाराला कोट्यवधींची कामे मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी स्वीकृत सदस्यांच्या नावाने स्थायी समितीला पाच निविदा मंजूर करण्यात आल्या. त्यात एकाच ठेकेदाराला सर्व कामे मिळाली आहेत. रास्ता पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठेत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम करण्यासाठी दोन कोटी ४४ लाखांचा निधी देण्यात आला आहे.

याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी (स्पिल ओव्हर) निधीची आवश्यकता आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मला दिली. त्यामुळे वर्गीकरण आणि प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.’’

कामे खरेच होणार का?
गेल्या दोन - तीन महिन्यांत सुमारे ५० कोटींचा निधी माजी नगरसेवकांच्या मागणीनुसार वळविण्यात आला आहे. या निधीतून गल्लीबोळातील किरकोळ कामे सुचविण्यात आली असून, अशा लहान कामांवर अधिकाऱ्यांना नियंत्रण ठेवणे अवघड असते. त्यामुळे ही कामे खरेच होणार का? असा प्रश्‍न यानिमित्ताने उभा राहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एप्रिल महिन्यात सोन्याच्या भावात मोठा बदल! अक्षय तृतीयेआधी बाजारात उलटफेर; जाणून घ्या आजचा भाव

विधान परिषदेच्या १७ जागांवर लवकरच निवडणूक, तर ९ सदस्यांचा कार्यकाळ संपणार; कुणाला किती जागा मिळणार?

Japanese Encephalitis: जपानी मेंदूज्वराविरोधात राज्य सरकार सतर्क; लसीकरण मोहिमेवर विशेष भर, आजारावर प्रभावी नियंत्रण आवश्यक!

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत उष्माघाताचा पहिला बळी; ४०°C तापमानामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Jalgaon Crime : लेकीच्या मानेवरच्या जखमांनी आईचे काळीज चिरले! हात स्कार्फने बांधून 17 वर्षीय मुलीवर अत्याचार; हुंदके देत पीडितेने सांगितली 'आपबीती'

SCROLL FOR NEXT