पुणे, ता. १३ : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे यांचे चतुरस्र कलावैभव उलगडणाऱ्या ‘नक्षत्रांचे देणे- पु. ल. देशपांडे’ या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हा विशेष कार्यक्रम शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी ६.३० वाजता कर्वेनगरच्या डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे सादर होणार आहे.
हा कार्यक्रम ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे प्रस्तुत करण्यात येत असून, याची संकल्पना आणि सादरीकरण ‘इंडियन मॅजिक आय’ यांचे आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक एसके फॉर्च्युन ग्रुप असून, सहयोगी प्रायोजक ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.’ आणि ‘अथश्री बाय परांजपे’ हे आहेत.
‘नक्षत्रांचे देणे’ हा साहित्य, संगीत आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींच्या कार्याचा धांडोळा घेणारा आणि त्यांचा जीवनपट रंजक पद्धतीने उलगडून दाखवणारा कार्यक्रम आहे. पु. ल. देशपांडे यांच्या चतुरस्र प्रतिभेची सफर या कार्यक्रमातून रसिकांना घडणार आहे. पुलंच्या साहित्यातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा या कार्यक्रमात साकारण्यात येणार आहेत. तसेच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचेही सादरीकरण होईल. तसेच, पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील निवडक भागांच्या अभिवाचनाचाही यात समावेश असेल.
आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, गिरिजा ओक-गोडबोले, पं. रघुनंदन पणशीकर, हृषिकेश कामेरकर, अंजली मराठे आदी कलाकार हा कार्यक्रम सादर करणार आहेत. याची संकल्पना व दिग्दर्शन श्रीरंग गोडबोले यांचे आहे. या कार्यक्रमाची मोजकीच तिकिटे शिल्लक असून, ही तिकिटे आरक्षित करण्यासाठी ticketkhidakee.com किंवा bookmyshow.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’ने केले आहे.
‘नक्षत्रांचे देणे- पु. ल. देशपांडे’
कधी : शुक्रवार (ता. २०)
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कुठे : पंडित फार्म, डीपी रस्ता, कर्वेनगर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.