पुणे

उपचाराबरोबरच रुग्णांना हव्यात ‘लक्झरी’ सुविधा सर्वसाधारण कक्षाऐवजी हवेत स्वतंत्र, सुविधा असलेले कक्ष

CD

ज्ञानेश्‍वर भोंडे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १० : ‘डॉक्‍टर, मला शस्त्रक्रियेसाठी रुग्‍णालयात भरती व्‍हायचे आहे. परंतु, मला इतर रुग्‍ण असलेला सर्वसाधारण कक्ष नको, तर त्‍यासाठी स्‍वतंत्र कक्ष (प्रायव्‍हेट रूम) हवा आहे. डॉक्‍टर, मला प्रसूतीसाठी भरती व्‍हायचे आहे. मात्र, मला मनोरंजन सुविधेबरोबरच फ्रिज, कपाट, सोफा व स्‍वच्‍छता अशा सर्व सुविधांनी युक्‍त असलेला आलिशान कक्ष (सूट) हवा आहे.’ अशा मागण्या आता रुग्‍णालयांत भरती होताना रुग्‍णांकडून होत आहेत. यावरून रुग्‍णांकडून हॉस्पिटलमध्येही हॉटेलसारख्‍याच खास सुविधा असलेल्‍या आरामदायी सुविधांची मागणी वाढत आहे.
रुग्‍णालयात जावे लागणे हे कोणालाही आवडत नाही. मात्र, जाण्‍याची गरज पडल्‍यास आता त्‍यामध्‍येही रुग्‍णांना सुविधा हव्‍या आहेत. उपचार किंवा शस्त्रक्रिया झाल्‍यावर त्‍यांना पुढील काही दिवस बरे होण्‍यासाठी किंवा निरीक्षणाखाली ठेवण्‍यासाठी सर्वसाधारण कक्षात (जनरल वॉर्ड) आणले जाते. या सर्वसाधारण कक्षात इतर रुग्‍णही असतात. केवळ खाटाभोवती असलेल्‍या पडद्याच्या आधारे त्‍यांना राहावे लागते. नातेवाइकांना बसण्‍यासाठी खास सुविधाही नसते. त्‍याऐवजी आरामदायी उपचारांची मागणी (क्लिनिकल कम्‍फर्ट) दिवसेंदिवस वाढत आहे. त्‍यासाठी मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये विविध सुविधा असलेल्‍या स्‍वतंत्र कक्षांची मागणी वाढली असून, बहुतेक रुग्‍णालयांत त्‍यासाठी प्रतीक्षादेखील करावी लागत आहे.
स्‍वतंत्र कक्षांमध्‍ये सुविधांच्‍या दर्जानुसार वेगवेगळे प्रकार आहेत. त्‍यामध्‍ये सेमी प्रायव्‍हेट, प्रायव्‍हेट रूम, डीलक्स रूम व सूट असे साधारण चार प्रकार पडतात. त्‍यांचे प्रतिदिन भाडेही सुविधांनुसार वाढते. विमा कंपन्‍या या सुविधा देत असल्‍याने रुग्‍णांकडून मागणी होते. तसेच काही वेळा रुग्‍ण या स्‍वतंत्र सुविधांचा खर्च स्‍वतः खिशातून भरतो. परंतु, त्‍यामुळे विम्‍याची खर्च असलेली मर्यादादेखील झपाट्याने संपते. म्‍हणून गरज असल्‍यासच या सुविधा घ्याव्‍यात, असे डॉक्‍टरांचे मत आहे.
मोठ्या शस्त्रक्रियेनंतर बरे होणाऱ्या रुग्णांपासून ते दीर्घकालीन आजारांवर उपचार घेणाऱ्यांपर्यंत अनेकांना सोफा, मनोरंजन, वैयक्तिक फ्रिजसह सज्ज डीलक्स रूमची सुविधा आवडते. त्‍याने रुग्णांचा ताण कमी होऊन लवकर बरे होण्यासाठी शांत, सुखद वातावरण महत्त्वाचे त्‍यांना वाटते. खासकरून बाळंतपणाच्या वेळी कुटुंबीयांना खासगी सूट्स व अतिरिक्त सुविधांची मागणी होत असल्‍याची माहिती वानवडीतील इनामदार रुग्‍णालयाच्‍या वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. रूपा शर्मा यांनी दिली.
.......
शस्त्रक्रियेनंतरची विश्रांती असो किंवा बाळंतपण, स्‍वतंत्र कक्ष हा रुग्‍णांचा ताण कमी करण्यास व त्‍यांना योग्‍य विश्रांती देण्‍यास मदत करतो. सोफा, फ्रिज, वॉर्डरोब आणि मनोरंजन सुविधांसह सज्ज डीलक्स रूम आरामदायी वाटत असल्‍या तरी त्यामुळे उपचारांवर फारसा परिणाम होत नाही. अशा उच्‍च सुविधांसाठी लागणाऱ्या खर्चामुळे विम्‍याची मर्यादा जलद रीतीने संपवली जाऊ शकते. म्‍हणून रुग्‍णांनी या उच्‍च सुविधांऐवजी भविष्‍यात लागणाऱ्या मोठ्या तपासण्या, अत्याधुनिक उपचार किंवा गुंतागुंतीच्या उपचारांसाठी राखून ठेवणे योग्‍य वाटते.
– डॉ. समीर पाटील, मणक्‍याचे शल्‍यविशारद, व्‍हेन्‍सर रुग्‍णालय, औंध
.............
कक्षाच्‍या प्रकारानुसार रुग्‍णालयांचे असे आहे प्रतिदिन शुल्‍क ः

कक्षाचे स्‍वरूप – प्रकार – सुविधा – अंदाजे शुल्क (प्रतिदिवस)

सेमी-प्रायव्हेट रूम – दोन रुग्‍णांसाठी दोन खाटा असलेला कक्ष – वातानुकूलित, सामाईक बाथरूम, टीव्ही, – ३ ते ५ हजार
प्रायव्हेट रूम – स्‍वतंत्र कक्ष – बाथरूम, टीव्ही, खुर्ची, नातेवाइकांसाठी खाटा– ५ ते ८ हजार
डीलक्स रूम – उच्‍च सुविधायुक्‍त स्वतंत्र कक्ष – वॉर्डरोब, फ्रिज, अधिक प्रशस्त आणि आरामदायी वातावरण – ८ ते १२ हजार
सूट – एकाहून अधिक खोल्‍या – अतिरिक्‍त सुविधा, नातेवाइकांसाठी स्वतंत्र बैठक, आराम कक्ष, स्‍वयंपाकगृह, मनोरंजन– १२ ते २० हजार
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack Case: वैद्यकीय चमत्कार! हार्टअटॅकने हृदयाचा एक भाग फाटला, रक्ताच्या गाठी जमा झाल्या... तरीही सोलापूरच्या डॉक्टरांनी वाचवले प्राण

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे एका व्यासपीठावर, फडणवीसही राहणार उपस्थित; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला, CSKने तुक्का मारला अन् स्टार सापडला; एबी डिव्हिलियर्सने IPL फ्रँचायझीचे टोचले कान

HSRP Number Plate: 15 ऑगस्ट आहे शेवटची तारीख! HSRP नंबर प्लेटसाठी आजच अर्ज करा

BJP आमदाराच्या मुलाने रस्त्यात गाडी लावल्यानं वाहतूक कोंडी, पोलिसांशी हुज्जत घालत म्हणाला, चल निघ

SCROLL FOR NEXT